शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांअभावी तीन शाळा बंद; इमारती ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:37 IST

शून्य पट असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लसणापूर, जिल्हा परिषद उर्दू शाळा जामठी बु. या दोन शाळांचा समावेश.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: सक्तीचे मोफत शिक्षण असतानाही विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे वळत असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा अनेक ठिकाणी बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी केवळ १-२ विद्यार्थी पटावर आहेत. अनेक ठिकाणच्या शाळा बंद पडल्याने इमारती मात्र ओस पडल्या आहेत.मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १४२ शाळा आहेत. तालुक्यात १४२ शाळांपैकी ८२ शाळा दोन शिक्षकी आहेत. यातील दोन शिक्षकी शाळांमधली पटसंख्या रोडावली आहे. काही शाळांमध्ये शून्य पटसंख्या असल्याने त्या बंद पडल्या आहेत, तर काही शाळांमध्ये एकाच विद्यार्थ्यासाठी शाळा सुरू ठेवण्यात आली असून, तेथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. ८२ शाळांमध्ये शून्य पट असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लसणापूर, जिल्हा परिषद उर्दू शाळा जामठी बु. या दोन शाळांचा समावेश असून, एंडली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वर्ग १ ते ४ पटसंख्येअभावी गत दोन वर्षांपूर्वीच बंद पडली आहे. आरखेड, कुरुम रेल्वे स्टेशन, शिराळा इथल्या शाळेत केवळ एक-एक विद्यार्थी असून, तेथे मात्र दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासन नियमाप्रमाणे १ ते २० पटसंख्या असलेल्या ठिकाणी संच मान्यतेनुसार दोन शिक्षकांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. असे शासकीय धोरण असल्याने १ ते २० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत.- स्मिता घावडे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी