शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘एसडीपीओं’च्या पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 14:37 IST

अकोला : बनावट नोटा प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला दुचाकी पुरविण्यासोबतच शहरातील एका नामांकित डॉक्टरच्या पत्नीकडून रिव्हॉल्व्हर प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याच्या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचाºयांची तडकाफडकी त्यांच्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली केली.

ठळक मुद्दे शेरअली, संतोष गवई आणि वाकोडे नामक पोलीस कर्मचाºयांच्या त्यांची मूळ पोलीस ठाण्यात बदली केली आहे.या कर्मचाºयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

अकोला : बनावट नोटा प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला दुचाकी पुरविण्यासोबतच शहरातील एका नामांकित डॉक्टरच्या पत्नीकडून रिव्हॉल्व्हर प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याच्या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचाºयांची तडकाफडकी त्यांच्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली केली.काही महिन्यांपूर्वी बनावट नोटा चलनात आणणाºया एका टोळीला पोलिसांनी नवीन बसस्थानकावर अटक केली होती. या टोळी एका आरोपीला एका पोलीस कर्मचाºयाने दुचाकी पुरविल्याचा आरोप असून, तशी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये नोंदसुद्धा घेण्यात आली. यासंबंधीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे, तर दुसºया एका प्रकरणात ‘एसडीपीओं’च्या विशेष पथकातील पोलीस कर्मचाºयांनी शहरातील एका नामांकित डॉक्टरच्या पत्नीकडे रिव्हॉल्व्हरचा रीतसर परवाना असतानादेखील तिला धाकदपट करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता, अशी पोलीस कर्मचाºयांमध्ये चर्चा आहे. या दोन्ही प्रकरणांच्या तक्रारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने पोलीस अधीक्षक कलासागर यांनी दखल घेतली आणि एसडीपीओंच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचारी शेरअली, संतोष गवई आणि वाकोडे नामक पोलीस कर्मचाºयांच्या त्यांची मूळ पोलीस ठाण्यात बदली केली आहे. या कर्मचाºयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचाºयांवर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची मूळ पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली. करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. त्यात तथ्य आढळून आल्यास पुढील कारवाई होईल.- राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस