शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात आणखी तीन महिला गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:51 IST

मुलीची चौकशी केली असता, तिने रमाबाई साहेबराव मोरे, गोकुळा ऊर्फ कोकी राजेश मोरे आणि वर्षा राजीक खान, योगेश श्रीराम बांगर (रा. लक्झरी बायपास) यांनी तिला ब्रिजेश गोकुळचंद शर्मा यांच्या माध्यमातून विनोद शर्मा याला विकले.

अकोला: शहरातील एका १४ वर्षीय मुलीची जयपूर येथे विक्री करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात खदान पोलिसांनी आणखी तीन महिलांना रविवारी अटक केली. यातील दोघा आरोपींना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.शहरातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिची १४ वर्षांची मुलगी २६ जानेवारी २0१९ रोजी झेंडावंदन करण्यासाठी शाळेत गेली; परंतु ती घरी परतली नाही. त्यामुळे महिलेने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर आरोपी तब्बू ऊर्फ मनीषा सादीक चौधरी (मनीषा विष्णू वानखडे (२५ रा. शंकर नगर अकोट फैल) हिला अटक केली. तिने आठ महिन्यांपूर्वी रात्रीच्या सुमारास रमाबाई साहेबराव मोरे (रा. अण्णाभाऊ साठे नगर अकोट फैल), गोकुळा राजेश मोरे, वर्षा गवई ऊर्फ वर्षा राजीक खान (रा. वाशिम बायपास), दुर्गा योगेश बांगर, योगेश बांगर यांनी विनोद दयालशंकर शर्मा (२८ रा. खोरालाडखानी जयपूर (राजस्थान) याला ६0 हजार रुपयांमध्ये विकले आणि तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. पोलिसांनी आरोपींसह राजस्थानला जाऊन मुलीचा शोध घेतला. मुलगी आढळून आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन आरोपी विनोद दयालशंकर शर्मा याला २१ डिसेंबर रोजी अटक केली. त्यानंतर मुलीची चौकशी केली असता, तिने रमाबाई साहेबराव मोरे, गोकुळा ऊर्फ कोकी राजेश मोरे आणि वर्षा राजीक खान, योगेश श्रीराम बांगर (रा. लक्झरी बायपास) यांनी तिला ब्रिजेश गोकुळचंद शर्मा यांच्या माध्यमातून विनोद शर्मा याला विकले. त्यानंतर विनोद शर्मा याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ३६८, ३७0, ३७0(अ), ३७६,(२), १२0(ब), आरडब्लू ४, ५(एल), ६ पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. खदान पोलिसांनी गोकुळा ऊर्फ कोकी राजू मोरे (३२ रा. लक्झरी बायपास), वैशाली ऊर्फ वर्षा दयाराम वानखडे (शाहिस्ता राजीक खान), उषा ऊर्फ रमाबाई साहेबराव मोरे (६0 रा. अकोट फैल) यांना रविवारी अटक केली. आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी