आणखी तिघांचा बळी; ६५ नवे पॉझिटिव्ह; ३१ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 07:09 PM2020-09-15T19:09:54+5:302020-09-15T19:10:23+5:30

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी अकोला शहर, वाडेगाव व मुर्तीजापूर येथील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १८९ झाली आहे.

Three more victims; 65 new positives; 31 corona free |  आणखी तिघांचा बळी; ६५ नवे पॉझिटिव्ह; ३१ जण कोरोनामुक्त

 आणखी तिघांचा बळी; ६५ नवे पॉझिटिव्ह; ३१ जण कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी अकोला शहर, वाडेगाव व मुर्तीजापूर येथील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १८९ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५७९६ झाली आहे. दरम्यान, आणखी ३१ जणांनी कोरोनावर मात केल्याने सद्यस्थितीत १२०४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ४९ रुग्णांमध्ये तेल्हारा तालुक्यातील दापूरा येथील सहा, एमरॉल्ड कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येक तीन, गोडेबोले प्लॉट, मोठी उमरी, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, सोपीनाथ नगर, अशोक नगर, शास्त्री नगर, लहान उमरी, लंगडगंज, बोरगाव मंजू, संभाजी नगर, मलकापूर, नानकनगर, दहिगाव गावंडे, नागे लेआऊट, आश्रय नगर, कौलखेड, चांदुर, गाडगे नगर, आदर्श कॉलनी, जूना तापडीया नगर, सिव्हील लाईन, जीएमसी, केशव नगर, सागूर अडगाव, कृषी नगर, संभाजी नगर, कार्ला बु. ता. तेल्हारा, तेल्हारा, चोहट्टा बाजार, खिरपूरी ता. बाळापूर, रुस्तमाबाद ता. बार्शिटाकळी व कट्यार येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १६ रुग्णांमध्ये अकोट येथील चार, जठारपेठ येथील दोन, मुर्तिजापूर, खदान, डाबकी रोड, रेल्वे स्टेशन जवळ, शंकर नगर, जीएमसी हॉस्टेल, मलकापूर, मुर्तिजापूर रोड, चांदूर व गीता नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तीन महिलांचा मृत्यू
मंगळवारी अकोला शहरातील राजेश्वर कॉलनी येथील ५६ वर्षीय महिला, बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ६५ वर्षीय महिला व मुर्तिजापूर येथील ६२ वर्षीय महिला अशा तिन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

३१ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच, कोविड केअर सेंटर, हेंडज येथून १२, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून चार, कोविड केअर सेंटर, अकोट येथून १० अशा एकूण ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


१२०४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७९६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४४०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२०४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Web Title: Three more victims; 65 new positives; 31 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.