आणखी तिघांचा बळी; १४१ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४१६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 03:51 PM2020-09-19T15:51:22+5:302020-09-19T15:51:59+5:30

शनिवार १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०६ वर गेला आहे.

Three more victims; 141 new positives; Total number of patients is 6416 | आणखी तिघांचा बळी; १४१ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४१६

आणखी तिघांचा बळी; १४१ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६४१६

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०६ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६४१४ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३६९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४१ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये ५२ महिला व ८९ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील २५ जणांसह, पातूर येथील १५ , पिंगळा येथील १०, डाबकी रोड येथील सहा, चान्नी ता. पातूर, लहान उमरी व जीएमसी येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, सिंधी कॅम्प व जठारपेठ येथील चार, गीता नगर, बार्शिटाकळी, हरिहर पेठ, सिरसो, गुसरवाडी, मलकापूर रोड येथील प्रत्येकी तीन, गौरक्षण रोड, मलकापूर, जवाहर नगर, रामदासपेठ, तेल्हारा, तोष्णीवाल लेआऊट, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, कुरुम, रामदास प्लॉट, खेमका सदन जि.प., दिग्रस बु., पीकेव्ही, खामखेड ता.पातूर, शिर्ला ता.पातूर, अकोट फैल, काटेपूर्णा, अकोट, कान्हेरी सरप, कौलखेड, बाजोरिया लेआऊट, बाळापूर, चोहट्टा बाजार, खदान, रमापूर, आगर, दुर्गा चौक, ब्लॅड बॅक जवळ, कॅलेक्टर कॉलनी, मानिक टॉकीज मागे, बाळापूर रोड, दुर्गा नगर, तापडीया नगर व मोबिला नगर येथील प्रत्येकी एक अशा १४१ रुग्णांचा समावेश आहे.


तिघांचा मृत्यू
शनिवारी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये रामदासपेठ, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी येथील ७४ वर्षीय पुरुष, खामखेड, अकोला येथील ५७ वर्षीय पुरुष या तिघांचा समावेश आहे.


१५३८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६४१६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४६७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १५३८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Web Title: Three more victims; 141 new positives; Total number of patients is 6416

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.