शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात तिघांचा मृत्यू, ३३२ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:01 IST

CoronaVirus News आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४३० झाला आहे.

अकोला : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे सत्र सुरुच असून, मंगळवार, २३ मार्च रोजी जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४३० झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३५, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ९७ असे एकूण ३३२ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २५,१०८ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२२७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शास्त्रीनगर येथील सात, जीएमसी आणि अकोट येथील पाच, तारफैल, शिवनी, बोरगाव मंजू, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी चार, वाठुळकर लेआऊट, रणपिसेनगर, मोरगाव भाकरे, गीता नगर, अंत्री, मोठी उमरी व खदान येथील प्रत्येकी तीन, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, वानखडे नगर, आळशी प्लॉट, मलकापूर, आनंदनगर, खडकी, बार्शी टाकळी, सांगळूद, बाभुळगाव, न्यू भिमनगर, नवरंग सोसायटी, डीएसपी ऑफिस, दुधलम व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तसेच अनिकट, रामी हेरीटेज, केशवनगर, चिखली रोड, उगवा, न्यू खेतान नगर, माझोड, मुंडगाव, देशमुख फैल, पंचगव्हाण, निंबी मालोकार, पुनोती, वरोडी, शिवर, दहिगाव गावंडे, साईनगर, केडीया प्लॉट, जठारपेठ, माता नगर, गुरुदत्त नगर, आश्रय नगर, बाळापूर नाका, सावरगाव, जुना आंदुरा, महाकाली नगर, भवानी नगर, पिंजर, जवाहर नगर, डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी, सुकळी, तेल्हारा, धरसोडी, बलवंत कॉलनी, न्यु खेतान नगर, जुने शहर, अडगाव, हसनापूर ता. बाळापुर, महसूल कॉलनी, जिल्हा स्त्री रुग्णालय क्वार्टर, केळकर हॉस्पिटल, पिंपळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

सायंकाळी बार्शीटाकळी व कौल खेड येथील प्रत्येकी सहा, मलकापूर, जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी चार, पातूर, सावरखेड, खडकी, शिवनी, गीतानगर, जठारपेठ, मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, टेलिफोन कॉलनी, गजाननगर, रतनलाल प्लॉट, केशवनगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड, म्हैसांग, बोरगाव मंजू, मुर्तिजापूर, सस्ती, रामदासपेठ, पिंपळखुटा आणि दगडपारवा येथील प्रत्येकी दोन तर शास्त्री नगर, अकोट, भंडारज, खानापूर, चांदूर, कॉग्रेस नगर, वनोजा, बाळापूर, न्यु तापडीया नगर, जुने शहर, शिरसोली, कोठारी वाटिका, लहरिया नगर, रणपिसे नगर, दुर्गाचौक, एसडीओ ऑफिस, जागृती विद्यालय जवळ, आपातापा, कान्हेरी, महागाव, डोनद बु., खरप, गोकुळ कॉलनी, शेलू हातोला, आंबेडकर नगर, आदर्श कॉलनी, संतोष नगर, पंचगव्हाण, जीएमसी, लाखनवाडा, रामनगर. रजपूतपुरा, तारफैल, राऊतवाडी, जुने आर टी ओ ऑफिस, दगडी पुल, तोष्णिवाल ले आऊट येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

३२ वर्षीय युवकाचा मृत्यू

गवळीपुरा येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णास २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोट येथील ४९ वर्षीय रुग्ण व गंगानगर येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या दोघांना अनुक्रमे २० व २५ रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

 

५४७ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना, होम आयसोलेशन मधील ४००, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील सहा, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १२, कोविड केअर सेंटर बार्शी टाकळी येथील १२, सूर्यचंदर हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेन्ट हॉस्पिटल येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सहा, आयकॉन हॉस्पिटल येथील आठ, युनिक हॉस्पिटल येथील तीन, सहारा हॉस्पिटल येथील तीन, अवघाते हॉस्पिटल येथील तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, नवजीवन हॉस्पिटल येथील नऊ, समाज कल्याण वस्तीगृह येथील १२, स्कायलार्क हॉटेल येथील पाच, ओझोन हॉस्पिटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, देवसर हॉस्पिटल येथील एक तर आरकेटी हॉस्पिटल येथील सहा अशा एकूण ५४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

५,९६५ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५,१०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १८,७१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४३० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,९६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला