शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

दिवसभरात तिघांचा मृत्यू, ४०० कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 19:42 IST

CoronaVirus News २० मार्च रोजी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ४२४ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, शनिवार, २० मार्च रोजी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ४२४ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३०, तर रॅपिड ॲण्टीजेन चाचण्यांमध्ये ७० असे एकूण ४०० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २३,८६६ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१८३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८५३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील २९, गोरेगाव खु. येथील १६, राजंदा व पारस कॉलनी येथील प्रत्येकी १०, बार्शीटाकळी व खारबडी येथील प्रत्येकी नऊ, बाळापूर व वागरगाव येथील प्रत्येकी आठ, पातूर व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी सहा, सारखेड ता. पातूर येथील पाच, खडकी, मलकापूर, किनखेड पुर्णा येथील प्रत्येकी चार, मारोतीनगर येथील तीन, सुधीर कॉलनी, गोरक्षण रोड, रणपिसेनगर, वृंदावननगर, कौलखेड, तेल्हारा, गोपालखेड, जठारपेठ, भौरद, पिंजर, वानखडेनगर, शिवणी, मोठी उमरी, निंबी मालोकर, जुने शहर, खदाण, सांगवी बाजार, कान्हेरी सरप, हाता, पैलपाडा, डाबकी रोड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, पिंपळखुटा, मुकुंदनगर, न्यू तापडियानगर, अयोध्यानगर, कोठारी वाटिका, खेडकरनगर, तुकाराम चौक, यशवंतनगर, ग्रामपंचायतीजवळ, शिवर, बिर्ला कॉलनी, रवीनगर, गिरीनगर, रामदास पेठ, गायगाव, बलोदे लेआउट, बोरगाव मंजू, टेलिफोन कॉलनी, शेलार फैल, देशमुख फैल, जैन चौक, पंकजनगर, अकशीलनगर, कलेक्टर ऑफिस, लहानउमरी, गोयंका लेआउट, हरिहर पेठ, दगडपारवा, महान, आळंदा, भेंडगाव, मोडकवाडी, कानशिवणी, काळा मारोती, फडकेनगर, महाकालीनगर, सिव्हिल लाइन, वाशिम बायपास, कटयार, अनिकट, श्रद्धा रेसिडेन्सी, रिधोरा, गायत्रीनगर, नयागाव, बजरंग चौक, हसनापूर, दाताळा, अमाखाँ प्लॉट, भारती प्लॉट, कैलास टेकडी, सहकारनगर, शिलोड, देशमुख फैल, मनकर्णा प्लॉट, जयहिंद चौक, गोरेगाव बु., चिखलगाव, जीएमसी, कळमेश्वर, समतानगर, जवाहरनगर, हनुमाननगर, आपातापा रोड, उमरी, रजपूतपुरा, उरळ, अकोट, केळकर हॉस्पिटल, अशोकनगर, अवामताळा व निंबा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

सायंकाळी गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ, मुर्तिजापूर, खडकी व मलकापूर येथील प्रत्येकी तीन, रामदासपेठ, डाबकी रोड, वृंदावन नगर, खदान, मोठी उमरी, पक्की खोली, जीएमसी, संत नगर, गंगा नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, चांदुर, अशोक नगर, विठ्ठल मंदिरजवळ, न्यु जैन मंदिर, आळशी प्लॉट, केळकर हॉस्पीटल, अशोक नगर, बिर्ला कॉलनी, राऊतवाडी, लाल बंगला, बदलापूर, डिएचडब्ल्यु हॉस्टेल, सुकळी, हिंगणा रोड, संतोष नगर, कपिलवास्तु नगर, रजपूतपुरा, इनकम टॅक्स चौक, एमआयडीसी, जूने आरटीओ रोड, निमवाडी, वाशिम बायपास, पक्की खोली, खद, तुकाराम चौक, पळसोबढे, बोरगाव मंजू, वरखेड, बायपास, पुनोती खुर्द, सेंट्रल जेल, अकोली जहागीर, हिवरखेड, रिंग रोड, विद्या नगर, कंवर नगर, गोकूल कॉलनी, माधव नगर, गीता नगर, सुधीर कॉलनी व केशव नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

एक पुरुष, दोन महिलांचा मृत्यू

शनिवारी उपचारादरमया्न आणखी तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये कृषी नगर, अकोला येथील ४८ वर्षीय पुरुष , गोरक्षण रोड, अकोला येथील ६८ वर्षीय महिला व पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या तिघांनाही अनुक्रमे, १५ मार्च, २० मार्च व ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

८४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५०, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथून आठ अशा एकूण ८४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

५,७७५ ॲक्टिव्ह रुग्ण

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३,८६६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,६६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,७७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला