अकोला : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सा लावणार्या तीन सटोडियांना रामदासपेठ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरातील आसरा कोल्ड्रक्सिं ॲन्ड हॉटेलमध्ये आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सा लावल्या जात असल्याची माहिती रामदासपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद ठाकरे यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह रेल्वे स्टेशन परिसरातील या ठिकाणी छापा घातला. यावेळी सिंधी कॅम्पमधील पक्की खोली भागात राहणारा राजेश कालुराम जसमतिया, निमवाडीतील नानकनगरात राहणारा मुकेश माणिकराम जीवतानी आणि आकोटचा राहणारा शेख नासीर शेख खुदबी हे तिघे क्रिकेट सामन्यावर सा लावत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याजवळून रोख ९ हजार १९५ रुपये, ५ मोबाईल आणि एक टीव्ही, असा एकूण २६ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर कलम ४ व ५ नुसार आणि मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक साठवणे, हेकाँ डामरे, पोकाँ जय इरचे आणि जामनिक यांच्या चमूने केली.
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सा तीन सटोडिये गजाआड
By admin | Updated: May 28, 2014 23:59 IST