शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 17:58 IST

अकोट फैल पोलिसांनी तीन जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अकोला : अकोट फैल परिसरातील भोईपुरा येथील रहिवासी प्रवीण कांबळे यांना त्यांच्या शेजारीच राहत असलेल्या गोलू कांबळे आणि अविनाश कांबळे यांनी ढकलून दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी तीन जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची म्हणजेच ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.भोईपुरा येथे असलेल्या मच्छी मार्केटमध्ये प्रवीण विजय कांबळे (४०) याने गणेश विश्वनाथ कांबळे त्यांचा मुलगा गोलू गणेश कांबळे आणि अविनाश गणेश कांबळे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते; मात्र या बाप-लेकांनी प्रवीणला दारू पिण्यास पैसे न दिल्याने त्याने तिघांनाही अश्लील शिवीगाळ केली. प्रवीणची शिवीगाळ असह्य झाल्यानंतर कांबळे पिता-पुत्राने त्याला ढकलले असताना अशक्त असलेला प्रवीण कांबळे जमिनीवर खाली कोसळला. जमिनीवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे अविनाश कांबळे, गोलू कांबळे याच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रवीण कांबळे यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास प्रवीण कांबळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी गणेश विश्वनाथ कांबळे तसेच त्यांचा मुलगा गोलू गणेश कांबळे आणि अविनाश गणेश कांबळे या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर तीनही आरोपींना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला