शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

खून प्रकरणातील तीन आरोपीस जंगलातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 11:09 IST

अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नासिर खान अजीज खान याची मंगळवार १८ आॅगस्ट रोजी निर्घृण हत्या केल्यानंतर या हत्याकांडातील या प्रकरणातील तीन आरोपीस तेल्हारा तालुक्यातील घोडेगावच्या जंगलातून अटक करण्यात अकोट फैल पोलिसांना यश आले. अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वी शेख जुनेद शेख मुख्तार यास अटक करण्यात आली आहे.शेख जुनेद शेख मुख्तार (३१) रा. हातरुण, अरबाज खान नियाज खान (१९) रा. घोडेगाव, ता. तेल्हारा, शेख जावेद शेख मुख्तार (२९) रा. हातरुण, ता. बाळापूर, शेख आमिर शेख खालीद (२९) रा. अडगाव, ता. अकोट या आरोपींनी शायदा बानो राजू यादव या महिलेच्या हत्याकांडातील आरोपी नासीर खान अजिज खान याची जामिनावर सुटका होताच १८ आॅगस्टच्या पहाटे अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्वाल धाब्यासमोर निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. सुरुवातीला नासिर खान याचा जावई शेख जुनेद शेख मुख्तार यास बुधवार १९ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम, पीएसआय जनार्दन खंडेराव, प्रकाश चौधरी, संजय पांडे, अस्लम शेख, श्रीकांत पवार यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी