शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी भुखंड घोटाळयातील तीन आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 17:42 IST

कोट्ट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप करीत घोटाळा केल्यानंतर यामधील तीन बडे अधिकारी अद्यापही फरार असतांना पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही.

अकोला: औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रीय अधिकारी दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांनी संगनमत करून भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करीत खोट्या व बनावट नोंदी करून कोट्ट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप करीत घोटाळा केल्यानंतर यामधील तीन बडे अधिकारी अद्यापही फरार असतांना पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. तीनही अधिकाºयांना जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.अकोला एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक टीए ७८, टीए ४६, एन १५४, एन १६० या भूखंडाच्या वाटपामध्ये तसेच मुदतवाढ प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा किशोर वासनिक रा. गणपती नगर लॉर्ड्स होस्टेलजवळ अमरावती, अमरावतीचे तत्कालीन क्षेत्र व्यवस्थापक दिलीप चेंडुजी पाटील रा. उमरेड जि. नागपूर, अमरावतीचे अतिरिक्त कार्यभार क्षेत्र व्यवस्थापक गजानन भास्कर ठोके रा. साई नगर मंदिराजवळ अमरावती, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन रा. दत्तकृपा सुधीर कॉलनी विवेकानंद आश्रम शाळेजवळ अकोला व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर रा. मालेवाडा रोड नागपूर या पाच बड्या अधिकाºयांविरुद्ध एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुळके यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व अधिकाºयांनी संगनमत करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी नियमबाहय कृत्य करून बनावट दस्तऐवज तयार केले व ते दस्तऐवज खरे असल्याचे सांगून फसवणूक केली, या भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाºयांविरुद्ध भूखंड घोटाळाप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड क्रमांक टीए ७८ या भूखंडाचे कागदपत्रे कार्यालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचे सागुन एक हजार चौरस मीटरचा भूखंड वाटपपत्राद्धारे श्रीमती कृपा शहा मे श्री कृपा लाजिस्टिक यांना करण्यात आल्याचे दाखवीले. हा घोट् सहायक क्षेत्र व्यवस्थापक अविनाश चंदन याने केला. दरम्यान या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली तर उर्वरीत तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळCrime Newsगुन्हेगारी