शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षेतून हजारो शिधापत्रिकाधारकांना डच्चू!

By admin | Updated: April 21, 2017 00:32 IST

यवतमाळमध्ये हजारोंचा नव्याने समावेश

सदानंद सिरसाट - अकोलाअन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांची निवड करून त्यांना धान्य पुरवठा सुरू झाला. आता त्यापैकी हजारो शिधापत्रिका वगळून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शिधापत्रिकांची निश्चित संख्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्यानंतर पुरवठा विभागाची अडचण वाढली आहे. कोणते शिधापत्रिकाधारक वगळावे, यासाठी आता हजारो शिधापत्रिकाधारकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ लागू केला. राज्यात अधिनियमाची अंमलबजावणी १ फेब्रुवारी २०१४ पासून सुरू झाली. त्यावेळी ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागातील ४५.३४ टक्के मिळून एकूण ७ कोटी १६ लाख लाभार्थी संख्येला कायद्यानुसार अन्नसुरक्षेचे कवच देण्यात आले. शासनाने १७ डिसेंबर २०१३ रोजीच ही संख्या निश्चित करण्याचे आदेश दिले.त्यानंतर शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यात आले, त्यामुळे पुन्हा पात्र लाभार्थींची संख्या १३ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या निर्णयाने बदलण्यात आली. काही जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षा योजनेतून शिधापत्रिका बाद करण्यात आल्या, तर काही जिल्ह्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. त्यानुसार बदललेल्या लाभार्थी संख्येचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला आहे.जिल्ह्यातील तब्बल ३६८३ शिधापत्रिकाधारकांना आता धान्य मिळण्यापासून वगळण्यात आले आहे. अमरावती विभागातील चार जिल्ह्यामध्ये हजारो शिधापत्रिका वगळल्या, तर यवतमाळ जिल्ह्यात हजारोंचा नव्याने समावेश करण्यात आला. या प्रक्रियेत काही जिल्ह्यात लाभ तर काही जिल्ह्यात लाभार्थींना फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील ३६८४ शिधापत्रिका अपात्रअकोला जिल्ह्यातील ३६८४ शिधापत्रिका अपात्र करण्यात आल्या, त्यामुळे त्या शिधापत्रिकाधारकांना आता धान्याचा लाभ मिळणार नाही. त्यातून कायद्याने मिळणारे अन्नसुरक्षेचे कवच शासनाने काढून घेतले आहे.चार जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारकांना फटकाअमरावती विभागातील पाचपैकी चार जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारकांना फटका बसला आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८२३, वाशिम-६६४, अकोला-३६८४, बुलडाणा-१४३९ असे एकूण ५२२७ शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आले आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात ४४५७ शिधापत्रिकाधारकांना नव्याने लाभ देण्यासाठी निवड केली जाणार आहे.