शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो कावडधारी शिवभक्त गांधीग्रामला रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 18:05 IST

अकोला: श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वराला येथून १८ किमी अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पवित्र पाणी कावडद्वारे आणून जलाभिषेक करण्याची अकोलेकरांची गत ७० वर्षांपासूनची परंपरा आहे.

ठळक मुद्देअकोल्यातील शेकडो शिवभक्त कावड घेऊन गांधीग्रामकडे रवाना झाले. सोमवारी शहरातील विविध मार्गांवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे

अकोला: श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वराला येथून १८ किमी अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पवित्र पाणी कावडद्वारे आणून जलाभिषेक करण्याची अकोलेकरांची गत ७० वर्षांपासूनची परंपरा आहे. यासाठी रविवारी अकोल्यातील शेकडो शिवभक्त कावड घेऊन गांधीग्रामकडे रवाना झाले.  देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा आहे. शहरातील शिवभक्त मंडळाच्या कार्यकर्ते महिनाभरापासून कावड यात्रेची तयारी करतात. ठरलेल्या संख्येप्रमाणे भरण्यांची कावड बांधून त्यावर आकर्षक संदेश देणारा सामाजिक, धार्मिक देखावा देखिल साकारतात. रविवारी शिवभक्त मंडळाच्या कावडधारी हजारो युवक पुर्णा नदीचे जल आणण्यासाठी वाहनांनी रवाना झाली. उशिरा रात्री शिवभक्त मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावर कावड घेऊन १८ किमी पायी चालत पहाटे अकोल्यात पोहोचतील आणि मिरवणुक काढून एक-एक मंडळाच्यावतीने राजराजेश्वराला जलाभिषेक करतील. 

बाभळेश्वर, डाबकी रोडवासी, श्रीराम सेनेची कावड आकर्षण! यंदाच्या कावड यात्रेमध्ये बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, डाबकी रोडवासी मित्र मंडळ, श्रीराम सेना यांची कावड विशेष आकर्षण राहणार आहे. तसेच हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १0१ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण राहणार आहे. कावडसोबतच शिवभक्तांनी पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारले आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सण