आम्हाला तुकडे तुकडे गॅंग म्हणणारे आता देशाचे तुकडे करताहेत, मेधा पाटकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 11:04 AM2022-11-17T11:04:36+5:302022-11-17T11:04:59+5:30

मेधा पाटकर या त्यांच्या टीम सह गुरुवारी पातुर येथून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत. 

Those who call us a piecemeal gang are now dividing the country, Medha Patkar alleges | आम्हाला तुकडे तुकडे गॅंग म्हणणारे आता देशाचे तुकडे करताहेत, मेधा पाटकर यांचा आरोप

आम्हाला तुकडे तुकडे गॅंग म्हणणारे आता देशाचे तुकडे करताहेत, मेधा पाटकर यांचा आरोप

googlenewsNext

अकोला:

आम्हाला तुकडे तुकडे गॅंग म्हणणारे आता देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत देशांमध्ये धर्माच्या नावाने राजकारण करून धर्मपंथ आणि समाजामध्ये विषमता निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी गुरुवारी वाडेगाव येथे केला.

मेधा पाटकर या त्यांच्या टीम सह गुरुवारी पातुर येथून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना मेधा पाटकर यांनी या देशांमध्ये विषमता निर्माण करण्याचे कार्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. ही विषमता दूर करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान वाचविण्यासाठी आणि भारत त्याला जोडण्यासाठी ही यात्रा असल्यामुळे आपण या यात्रेत सहभागी झाल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Those who call us a piecemeal gang are now dividing the country, Medha Patkar alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.