शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

सावतराम चाळीतील शिवनकाम करणाऱ्यांची तिसरी पिढीही उपेक्षित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 3:36 PM

सावतराम टेलर चाळीची तिसरी पिढीदेखील वंचिताचे जिणे जगत आहे.

- संजय खांडेकरअकोला : अकोला शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील गोरगरिबांना स्वस्त दरात हातोहात कपडे शिवून देणारी यंत्रणा गेल्या ७५ वर्षांपासून सावतराम मिल्सच्या टेलर चाळीत अविरत सेवा देत आहेत. या सेवेचा वारसा तिसऱ्या पिढीने कायम ठेवला असला तरी अद्याप येथील समस्या सोडविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे सावतराम टेलर चाळीची तिसरी पिढीदेखील वंचिताचे जिणे जगत आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाच्या भिंतीलगत सावतराम टेलर चाळ वसलेली आहे. जुन्या कापड बाजारात येणाºया ग्राहकांचे कपडे तातडीने शिवून देणाºया या चाळीला आता ७५ वर्षांचा कालावधी झाला. ही चाळ अजूनही त्याच अवस्थेत ऊन-पाऊस झेलत तटस्थ उभी आहे. वडिलांचा व्यावसायिक वारसा मुलांकडे आपसूकच आल्याने आता तिसरी पिढी येथे कार्यरत आहे. तब्बल चाळीस टेलर एका ओळीने येथे शिवणकाम करीत असतात. गोरगरिबांना हातोहात माप घेऊन कपडे शिवून देणाºया या चाळीत आता नवीन पिढी येत नसली तरी जुने जाणते येथे आजही त्याच विश्वासाने येतात. पट्ट्याची हाफ पॅन्ट, बंडी, पायजामा, सदरा, पॅन्ट, अल्टर करून देणाºया या चाळीतील सर्व टेलर्सचे कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. दिवसभर शिवणकाम करणारे टेलर रात्री जाताना आपल्या शिवण मशीन येथील मजबूत कुलूपबंद पेटीत ठेवून देतात. शिवणयंत्राचे पायडल मात्र त्याच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठेवून असते. आजपर्यंत येथे कधी चोरीची घटना घडली नाही. तीन पिढ्यांपासून सावतराम चाळीत सेवा देणारे टेलर यांना साधे ओटेदेखील बांधून देण्याची तसदी महापालिकेने घेतली नाही. लोकप्रतिनिधींनीदेखील कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे ही चाळ अजूनही उपेक्षितांचे जिणे जगत आहे. लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी आम्हाला अनेकदा सुविधा देण्याचे आश्वासन दिले; मात्र कुणीही शब्द पाळला नाही. महापालिकेचा कर आम्ही नियमित भरत असल्याने आम्हाला ही जागा उपलब्ध झाली आहे. मनपाने आम्हाला ओटे बांधून द्यावे.-वासुदेव श्रीराम शिंदे, टेलर, सावतराम चाळ, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक