शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

विदर्भात दोन दिवस धुकं राहणार;  हवामानशास्त्राचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 18:34 IST

येत्या दोन दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता असून,धुकंही पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञानी वर्तविला आहे.

अकोला : गत चोविस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता असून,धुकंही पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञानी वर्तविला आहे.सद्याच्य वेस्टर्न डिस्टर्बन्स च्या प्रभावामुळे हिमालयीन क्षेत्रात बर्फवृष्टी होत असून, पुढील काही दिवस जम्मू काश्मीर हिमाचल उत्तराखंड बराचसा उत्तर भारत गारठणार आहे् या भागातून येणारे थंड वारे दक्षिणेकडे वाहत असून, उत्तर प्रदेश ते विदर्भ ९०० मिटर उंचीवर कमी दाबाची द्रोणिय स्थिती निर्माण झाली आहे तसेच केरळ किनारपट्टीवर सुद्धा कमी दाबाची द्रोणिय स्थिती पाहता बंगालच्या उपसागरावरुन कोमट आणि बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे विदर्भाच्या उत्तर भागावर थंड आणि बाष्पयुक्त वाऱ्याची टक्कर होत असल्याने सध्या पाऊस पडत आहे. ही परिस्थिती आनखी एक ते दोन दिवस टीकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण जवळपास क्लियर होऊन हळूहळू थंडीचे प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे तसेच पुढील दोन तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी धुकं पडण्याची शक्यताही हवामान अभ्यासक अनिल बंड यांनी वर्तविली आहे.गत चोविस तासात रविवार,१५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.दुपारपर्यंत ढगाळ वातावरण व वातावरणात गारवा होता.तर काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. अकोला येथील हे किमान तापमान १७.३ अंशावर पोहोचले होते. बुलडाणा १७.०,वाशिम १५.८, अमरावती १८.४, यवतमाळ १७.४, वर्धा १८.४ नागपूर १६.८,चंद्रपूर १८.२,गोंदिया १७.५, तर ब्रम्हपुरीचे किमान तापमान १७.४ अंश होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भAkolaअकोलाweatherहवामान