शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नऊ प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:12 IST

अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. 

ठळक मुद्देपातूर तालुका १४,१६४ हेक्टरमधील सकल कृषी उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. पातूर तालुक्यात एकूण पाटबंधारे विभागाचे नऊ मध्यम व लघू सिंचन प्रकल्प आहेत. रब्बीच्या हंगामासाठी सिंचन प्रकल्पमधून कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मुख्य कालव्यातून पाटसर्‍याच्या माध्यमातून पोहोचणार्‍या पाण्यावर २४ हजारांहून अधिक शेतकरी गहू, हरभरा ही पिके रब्बीत दरवर्षी घेत असतात. यावर्षी मोर्णा प्रकल्प ७.४ दशलक्ष घनमीटर (१६.९८टक्के), निगुर्णा प्रकल्प १७.४६ द.ल.घ.मी. (६0.५१टक्के), सध्या पारस औष्णिक वीज प्रकल्प आणि शेगाव संस्थान एकूण १२.४८ द.ल.घ.मी. शासकीय आरक्षण, तुळजापूर 0.२९७ द.ल.घ.मी. (३४.१८टक्के), गावंडगाव 0.00 (0.00टक्के), सावरगाव 0.0५४ द.ल.घ.मी. (४.७९ टक्के), पातूर तलाव 0.६६५ द.ल.घ.मी. (३५.८८टक्के), विश्‍वमित्री प्रकल्प ३.२५ द.ल.घ.मी. (३२.५१टक्के), संग्राहक तलाव झरंडी 0.४१६ द.ल.घ.मी. (२३.१६टक्के) व हिवरा तलाव 0.२३८ द.ल.घ.मी. (१0.३८ टक्के) एवढीच पाण्याची पातळी आहे.यावर्षी पातूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील हजारो शेतकर्‍यांनी खरिपातील अवर्षणप्रवणतेने हवालदिल झाल्यानंतर नव्या उमेदीने रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची संपूर्ण तयारी मोठय़ा जिकरीने पूर्ण केली होती. मात्र, सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने मोठे संकट शेतकर्‍यांवर कोसळले आहे. पातूर तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक पावसाची हजेरी असते मात्र ह्यावर्षी ४00 मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरिपाच्या हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनचे पीक हातातून गेले. उत्पादन खर्चही निघाला नाह. मात्र, शासनाने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत शेतकर्‍यांना अद्यापपयर्ंत केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून खरिपातील अवर्षणप्रवणतेने झालेल्या नुकसानाची भरपाई भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची केलेली संपूर्ण तयारी वाया गेली आहे. 

पातूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठा कमी आहे, सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी कोणत्याही प्रकल्पात नाही - अत्तरकार, शाखा अभियंता, सिंचन विभाग पातूर                             पातूर तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पावरील यावर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला आहे. त्या संदर्भातील नियोजन सभा रद्द करण्यात आली आहे. - अनिल राठोड,  उप अभियंता सिंचन शाखा अकोला 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण