शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या आकडेवारीत अनियमितता नाही - जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:51 IST

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदानाच्या आकडेवारीत कोणतीही अनियमिता आढळून आली नाही.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदानाच्या आकडेवारीत कोणतीही अनियमिता आढळून आली नाही. त्यामुळे यासंदर्भात करण्यात आलेली तक्रार नस्तीबद्ध करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेच्या दिवशी दर्शविण्यात आलेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी आढळून आलेले मतदान, यामध्ये १३९ मतांचा फरक असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुलताने व प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी २७ मे रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केली होती. मतदान केंद्राध्यक्षांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी कळविताना लेखनप्रमाद करणे, टंकलेखनात प्रमाद होणे किंवा निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राच्या आधारे केलेले मतदान झालेल्या मतदानात न मोजल्यामुळे किंवा केलेल्या मतदानाची दुबार नोंद घेणे इत्यादी कारणांमुळे आकडेवारीत तफावत निर्माण झाल्याचे दिसून येते. यासंदर्भात सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या स्तरावर परिपूर्ण छाननी करण्यात आली असता, कोणतीही अनियमितता आढळून आली नाही. त्यामुळे तक्रार नस्तीबद्ध करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने व राजेंद्र पातोडे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी