शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या निकषांचा स्पष्ट आदेशच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:47 IST

अकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील चित्र : केवळ चार शेतक-यांना दहा हजारांची मदत

विजय शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे शासनाकडून देण्यात येणाºया तातडीच्या दहा हजार रुपये अनुदानाचा लाभ अकोट तालुक्यात केवळ चार शेतकºयांना देण्यात आला आहे.शेतकºयांना कर्जमाफी देण्यावरून सरसकट, तत्त्वत: आदी विविध प्रकारच्या घोषणा शासनाने केल्यात; परंतु स्पष्ट असा आदेश बँकांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे नेमक्या कर्जमाफीकरिता कोणते-कोणते शेतकरी पात्र ठरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोट तालुक्यात ५९ सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून अंदाजे साडेसात हजार शेतकºयांना ५४ कोटी ६२ लाख ४३ हजारांचे नवीन कर्ज वाटप करण्यात आले आहे. सन २०१४-१५ पासून असलेल्या कमीत कमी सात हजार शेतकºयांना पुनर्गठन करून देण्यात आले आहे. कर्जमाफीच्या आदेशाचा पूर्णत: निर्णय लागत नसताना शासनाने शेतकºयांना दहा हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्याची घोषणा केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून तालुक्यातील केवळ चारच शेतकºयांनी प्रत्येकी दहा हजारांचे अनुदान घेतले आहे.बँकांमार्फत अजूनही दहा हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत आहेत; परंतु दहा हजार रुपयांचे अनुदान घेतल्यास कर्जमाफी मिळणार की नाही, हे अद्याप शासनाने स्पष्ट न केल्याने शेतकरीसुद्धा या दहा हजारांच्या अनुदानाकडे पाठ फिरवित आहेत. यापूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ३० जून २०१७ पर्यंत अकोट तालुक्यातील १ हजार ३०० शेतकरी थकबाकीदार राहिले होते.या शेतकºयांनी आपल्या कर्जाचा भरणा केला नाही; परंतु निकष व कर्जमाफीची पात्रता ठरविण्याबाबतचा शासनाचा स्पष्ट आदेश बँकांपर्यंत न पोहोचल्याने बँकांनीसुद्धा याद्या लावल्या नाहीत. कर्जमाफी नेमकी कोणत्या वर्षापर्यंत दिली जाणार व कोणते शेतकरी याचे लाभार्थी ठरणार, हे स्पष्ट झाल्यानंतर अकोट तालुक्यातील १ हजार ३०० शेतकºयांच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अनेक शेतकºयांनी कर्जाचे केले पुनर्गठनअकोट तालुक्यातील ५९ सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सन २०१५-१६ च्या हंगामात १५ हजार ८७७ शेतकºयांना ८४ कोटी ८९ लाख ८ हजार पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार ९५८ शेतकºयांनी ५५ कोटी ५५ लाख ५७ हजार एवढा भरणा केला. दरम्यान, ११ हजार ९५ शेतकरी सभासदांनी अद्यापही ३ कोटी २७ लाख ८ हजार थकीत रक्कम भरली नाही, तर ५२ शेतकरी सभासदांनी २०१६-१७ मध्ये ८ लाख २४ हजार एवढी रक्कम भरली आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या आदेशानंतरच पीक कर्जमाफीचा आकडा समोर येण्याची शक्यता आहे.कर्जमाफीचा निकष व पात्रता ठरविण्याबाबत अद्याप कोणताच स्पष्ट आदेश आमच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, हे सांगता येत नाही.- एस.डी. वालसिंगे,वरिष्ठ निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती बँक अकोट.