बुलडाणा : राष्ट्रवादी पक्षासोबत कुठलेही सोटेलाटे नाही अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.भारतीय जनता पार्टीने परिवर्तनाची दिशा ठरवित नव्या दमाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. महायुतीमध्ये असलेल्या पक्षांना घेऊन ही लढाई सुरू असताना काँग्रेसगोटातून भाजपा-राष्ट्रवादी असे साटेलोटं असल्याचा आरोप केला जाता आहे. ज्या राष्ट्रवादीचा सिंचन घोटाळा बाहेर काढून ज्यांच्या विरोधात आम्ही लढत होतो तेंव्हा हेच आरोप करणारे त्यांची पाठराखण करीत होते, त्यामुळे हा आरोप निव्वळ धुळफेक आहे असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले .बुलडाणा येथे भाजपा उमेदवार योगेंद्र गोडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार डॉ.रणजीत पाटील होते तर मंचावर योगेंद्र गोडे यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, जगदेवराव बाहेकर, अँड.व्ही.डी.पाटील, एकनाथ खर्चे, विजया राठी, वैशाली डाबेराव, दत्ता खरात, दत्ता पाटील आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीवर टिका करीत भाजपाचे सरकार आल्यावर सिंचनाचा घोटाळा करणारे अजित पवार हे तुरूंगात असतील असे आश्वासन दिले. काँग्रेसच्या राज्यात शेतकर्यांच्या आ त्महत्या वाढल्या, बेरोजगारी, महागाई वाढली त्यामुळे येणार्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीचे तण फेकून द्या व मोदी विचारांची शेती करा असे आवाहन त्यांनी केले. उमेदवार योगेंद्र गोडे यांनी बुलडाणा म तदारसंघाच्या विकासाचे चित्र मांडत बुलडाण्यात मेडिकल कॉलेज निर्मितीसाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगीतले.
राष्ट्रवादीसोबत कुठलेही साटेलोटे नाही
By admin | Updated: October 2, 2014 23:49 IST