शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

स्थायीच्या सभेत आदेश देऊनही शाखा अभियंत्यावर कारवाई नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:34 IST

अकोला : बाळापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता वामन राठोड यांच्या कार्यकाळात कामांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, तो प्रकार अनेक कामांतून पुढे आला. त्यासाठी दिलेल्या नोटिशीच्या स्पष्टीकरणानंतर प्रभार काढण्यासोबतच दोन वेतनवाढी रोखण्याच्या कारवाईचा आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी स्थायी समितीच्या सभेत २0 सप्टेंबर रोजी दिला. अद्यापही ती कारवाई कागदावरच सुरू असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसस्ती, वाडेगावच्या कामातील घोळासाठी राठोड यांच्यावर कारवाईचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता वामन राठोड यांच्या कार्यकाळात कामांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, तो प्रकार अनेक कामांतून पुढे आला. त्यासाठी दिलेल्या नोटिशीच्या स्पष्टीकरणानंतर प्रभार काढण्यासोबतच दोन वेतनवाढी रोखण्याच्या कारवाईचा आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी स्थायी समितीच्या सभेत २0 सप्टेंबर रोजी दिला. अद्यापही ती कारवाई कागदावरच सुरू असल्याची माहिती आहे.शाखा अभियंता वामन राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामांमध्ये मोठे घोळ केल्याचे प्रकार सातत्याने पुढे येत आहेत. त्यावर अनेक तक्रारीही झाल्या. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. मात्र, सभा आटोपल्यानंतर अधिकारी त्या मागणी, ठरावाला केराची टोपली दाखवत असल्याचे अनेक प्रकारही घडत आहेत. शाखा अभियंता राठोड यांच्याबाबत २0 सप्टेंबर २0१७ रोजीच्या बैठकीत विविध तक्रारी करण्यात आल्या. त्यामध्ये वाडेगाव येथील दलित वस्ती काम मंजूर ठिकाणी न करता भलत्याच ठिकाणी केले. त्यासाठी शाखा अभियंता यांनी आधी दिलेले लेआउट ठिकाण वगळण्यात आले. विशेष म्हणजे, त्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केल्याचा फोटो लावण्यात आला. या प्रकाराने जिल्हा परिषद सदस्याचा अवमान झाल्याचा मुद्दा डॉ. हिंमत घाटोळ यांनी लावून धरला. शाखा अभियंता राठोड यांनी बाळापूर, पातूर तालुक्यात असे कामे करून हैदोस घातल्याचेही डॉ. घाटोळ यांनी सभागृहाला सांगितले होते. तसेच कारवाईची मागणी केली. त्यानंतर सस्ती येथील आरोग्य केंद्र बांधकाम निकृष्ट होत आहे. बाळापूर, पातूर तालुक्यातील इतरही कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. शाखा अभियंता राठोड मनमानी करत आहेत. ठेकेदारांना हाताशी धरून कामे करत आहेत. त्यामुळे त्यांची बाळापूर पंचायत समितीतून बदली करावी, तसेच प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी ८ सप्टेंबर रोजीच बाळापूर गटविकास अधिकार्‍यांना चौकशी करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले. संतप्त सदस्यांनी कारवाईची मागणी लावून धरल्याने, सभेला उपस्थित असलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांनी शाखा अभियंता राठोड यांचा प्रभार काढून घ्यावा, तसेच दोन वेतनवाढी रोखण्यासाठी फाइल सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्यानुसार पाच महिन्यांपासून अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे राठोड यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सातत्याने सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषद