शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सेवेत समायोजन नाहीच; ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न अपुरेच!

By प्रवीण खेते | Updated: September 10, 2022 18:37 IST

त्रिसदस्यीय मंत्री समितीच्या शिफारशी शासनाने फेटाळल्या

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी तसेच विविध मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्रिसदस्यीय मंत्री समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव फेटाळत यात मांडण्यात आलेल्या बाबी तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने त्या मान्य करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. या संदर्भात गुरुवार ८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांमार्फत स्थानिक आरोग्य विभागाला कळविण्यात आले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासंदर्भात अभ्यास व शिफारशी करण्यासाठी २०१८ मध्ये शासनाने त्रिसदस्यीय मंत्री समितीचे गठण करण्यात आले होते. समितीतर्फे २८ जून २०१९ रोजी बैठक घेऊन तीन मुद्दे मांडले होते. यामध्ये शासनाच्या मेगाभरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या ३ टक्के गुण प्रती अनुभवाचे वर्ष याप्रमाणे कमाल ३० टक्के गुणाधिक्य देण्यात यावे. उमेदवारास सरळसेवा लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये अनुभवाचे गुण समाविष्ट करून निवडीसाठी गुणानुक्रम निश्चित करण्यात यावा. तसेच कर्मचाऱ्यांची कंत्राटी सेवा झाली असेल, तेवढ्या कालावधीसाठी कमाल बयोमर्यादा शिथिल करण्यात यावी. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क, गट ड आणि ग्रामविकास विभागातील रुग्णसेवेची पदे भरताना ४० टक्के पदे राखीव ठेवावीत. यासाठी सेवा प्रवेश नियमांत बदल करण्यासाठी प्रत्येक संवर्गाचा स्वतंत्र प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभाग यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेस्तव सादर करण्याचा प्रस्ताव मांडला होता. शासनाने या शिफारशी फेटाळून लावला असून, मंत्रिमंडळासमोरही सादर करण्यात येणार नसल्याचे शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यAkolaअकोलाhospitalहॉस्पिटल