शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील दूषित पाण्याच्या विळख्यात ५७ गावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:17 IST

अकोला : ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यात हानिकारक रसायनांसोबतचे ते पाणी कमालीचे दूषित असल्याने जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांची निवड झाली; मात्र त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवण्यात येत असून, उर्वरित १५ गावांचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देजलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांची निवड झाली. २० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण यंत्रे बसवण्यात आली. सऱ्या टप्प्यात ५७ गावांमध्ये यंत्रे बसण्याला मंजुरी देण्यात आली.

अकोला : ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यात हानिकारक रसायनांसोबतचे ते पाणी कमालीचे दूषित असल्याने जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांची निवड झाली; मात्र त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवण्यात येत असून, उर्वरित १५ गावांचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता खराब असलेल्या २० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण यंत्रे बसवण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५७ गावांमध्ये यंत्रे बसण्याला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवली जात आहेत. उर्वरित १५ गावांचा प्रस्ताव आता सादर केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

दूषित पाणी पुरवठ्यामुळे निवड झालेली गावेअकोला : आपोती बुद्रूक, बादलापूर, भोड, दहीगाव गावंडे, धोतर्डी, एकलारा, खांबोरा, लोणी, वैराट राजापूर, कापशी रोड. अकोट : कावसा बुद्रूक, लामकाणी, मरोडा, तरोडा. बार्शीटाकळी : मोरगाव काकड, पार्डी. मूर्तिजापूर : लाईत, हातगाव, हिवरा कोरडे, रोहणा, मुंगशी, पारद, लाखपुरी, कोळसरा, सांगवी, शेलू नजिक, टिपटाळा, दापुरा, गुंजवाडा, ताकवाडा, शिरताळा. तेल्हारा : बाभूळगाव, उबारखेड, मनब्दा, नेर, पाथर्डी, सांगवी, सिरसोली, खाकटा, वांगरगाव.

अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बंदग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी असलेली जलशुद्धीकरण संयंत्रेच बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, टिटवा कान्हेरी सरप, एरंडा, घोटा येथे जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी येथे पंप बंद आहे. उमरी येथे अद्यापही पुरवठा सुरू झाला नाही. बोरगाव मंजू येथे थकीत देयकामुळे बंद आहे.

यंत्रे परत घेण्यासाठी बजावली होती नोटीसआठ गावांतील संयंत्रे सुरुवातीपासूनच बंद आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सर्वच ग्राम पंचायतींना अंतिम नोटीसही बजावली होती. त्यामध्ये जलशुद्धीकरण यंत्रांची गरज नसल्यास इतर गावांमध्ये बसवण्यासाठी ती परत घेण्यात येतील, याबाबत म्हणणे सादर करण्याचे बजावले होते. त्यावर अद्याप तरी कारवाई झाली नाही.

१० ते २५ पैसे लिटरने पुरवठाग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ग्राम पंचायतींच्या देखरेखीखाली ती चालवली जातात. त्यासाठी ग्रामस्थांकडून शुल्क घेतले जाते. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १० पैसे लिटर, तर काही गावांमध्ये १५ आणि २५ पैसे लिटरप्रमाणे शुल्क घेतले जाते.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी