शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’तील वाइन बार फोडून चार लाखांची दारू पळविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 09:50 IST

एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या बीके चौक परिसरातील कार्तिक वाइन बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत सुमारे चार लाख रुपयांचा दारूसाठा अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. ‘लाकडाउन’ सुरू केल्यानंतर वाइन बार बंद असल्याने दारुड्यांनीच ही चोरी केल्याची माहिती आहे. राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या वसाहतमधील फेज क्रमांक-३ मध्ये असलेल्या कार्तिक वाइन बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमधील दारूसाठा कोरोनाच्या ‘लॉकडाउन’मुळे तसाच ठेवण्यात आला होता. दरम्यान, १४ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी कार्तिक वाइन बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करून या बारमधील तब्बल चार लाख रुपयांचा दारूसाठा लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच बार मालक यांनी बारमधील साठा पाहणी केली असता, तब्बल ४ लाख रुपयांची दारू अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे समोर आले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र जिल्ह्यातील दारूसाठा चोरी केल्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती असून, पोलिसांनी आत या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. एमआयडीसीचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.बारमधील चोऱ्यांमुळे आव्हानमद्यपींना दारू मिळत नसल्याने वाइन बार तसेच वाइन शॉप फोडून दारू व बिअर चोरी झाल्याच्या घटना राज्यभर घडलेल्या आहेत. यामध्ये आता अकोल्यातील एमआयडीसी परिसरातील वाइन बार फोडून चार लाख रुपयांचा दारूसाठा पळविल्याने पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागासमोर आव्हान उभे ठाकले आहे. या बारमधील साठा ‘सील’ केला असून, तो चोरी गेल्याने आता बार मालकासह सरकारी यंत्रणेची पंचाईत झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळCrime Newsगुन्हेगारी