शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातून परस्पर आॅनलाइन रक्कम काढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:40 IST

एका वृद्धाच्या स्टेट बँकेतील खात्यातून हरियाणातील एका चोरट्याने परस्पर आॅनलाइन रक्कम काढून आली.

अकोला : शहरातील मासूमशाह दर्गाजवळ राहणाऱ्या एका वृद्धाच्या स्टेट बँकेतील खात्यातून हरियाणातील एका चोरट्याने परस्पर आॅनलाइन रक्कम काढून आली. पहिल्यांदा त्याने ४0 हजार रुपये आणि नंतर दोन वेळा प्रत्येकी १0 हजार रुपयांची रक्कम काढून तब्बल ६0 हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.मासूमशाह दर्गाजवळ राहणारे सैयद इकबाल सैयद इब्राहिम यांच्या तक्रारीनुसार २३ आॅगस्ट रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान त्यांच्या मोबाइलवर भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून ४० हजार रुपये दुसºया एका व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा संदेश आला. त्यानंतर पुन्हा दोन वेळा प्रत्येकी दहा हजार रुपये काढल्याचा संदेश आला. सैयद इकबाल यांनी कोणालाच एटीएम कार्ड क्रमांक, पीन क्रमांक किंवा ओटीपी क्रमांक दिला नसतानाही त्यांच्या खात्यातून ६0 हजार रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर करण्यात आल्याची घटना घडली. २४ आणि २५ आॅगस्ट रोजी बँकेला सुटी असल्यामुळे त्यांना बँकेत चौकशी करता आली नाही; परंतु २६ आॅगस्ट रोजी त्यांनी स्टेट बँकेत जाऊन विचारणा केली असता, त्यांच्या खात्यातून विवेक मोहन उमाले व्यक्तीने पैसे काढल्याची माहिती मिळाली आणि हा व्यक्ती हरियाणा येथील असल्याचे त्यांना कळले. घाबरलेल्या सैयद इकबाल यांनी तातडीने रामदासपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विवेक उमाले (हरियाणा) याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला.  सायबर गुन्हे शाखेला आव्हानगत काही महिन्यांपासून आॅनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. आॅनलाइन खरेदी, बँक खात्यातून परस्पर आॅनलाइन रक्कम काढून घेण्याच्या घटना घडत आहेत. सैयद इकबाल यांनी कोणतीही माहिती न देता, त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात येते. हा प्रकार सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना आव्हान देणारा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम