शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, कृषी विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर

By नितिन गव्हाळे | Updated: August 23, 2022 15:10 IST

Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

- नितीन गव्हाळे अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाहीतर हा युवक मुलींच्या रूममध्येसुद्धा गेला. या घटनेमुळे कृषि विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे, या युवकाला मुलींना वसतिगृहात शिरण्यासाठी मदत केल्याचे दिसून येत आहे.

कृषि विद्यापीठ परिसरातील उजव्या बाजुला सावित्री वसतिगृह आहे. याठिकाणी सुरक्षा रक्षकासोबतच, वसतिगृह अधीक्षिकासुद्धा आहे. मुलींच्या वसतिगृहामध्ये बाहेरील व्यक्तींसह अनोळखी युवकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही हा युवक मुलीसारखे तोंडाला स्कार्प बांधून, दोन युवतींसोबत वसतिगृहात शिरत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा युवक व दोन युवती एकमेकांना ओळखत असून, ते बीएससी ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी दिसत असून, या युवकाला वसतिगृहात चोरून येण्यासाठी वसतिगृहातील दोन युवतींनी त्याला मदत केल्याचे दिसून आले. वसतिगृहात यशस्वीरित्या शिरल्यानंतर या दोन्ही युवती त्याला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. याठिकाणी बेडवर बसून गप्पा करण्यासाठी सेल्फीसुद्धा काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी उघडकीस आलेल्या प्रकारामुळे कृषि विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 वसतिगृह अधीक्षिका काय करत होत्या?मुलींच्या वसतिगृहामध्ये पुरूष, युवकांना जाण्यास मनाई आहे. असे असतानाही दोन युवती, युवकाला वेशांतर करून वसतिगृहातच नव्हेतर रूममध्ये घेऊन गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. असा प्रकार घडणे हे गंभीर असून, यावेळी वसतिगृहाच्या अधीक्षिका काय करत होत्या. त्यांचे वसतिगृहावर नियंत्रण नाही काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पालक मोठ्या आशेने मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवितात. वसतिगृहातील वातावरण सुरक्षित असेल म्हणून वसतिगृहाच्या अधीक्षिका, सुरक्षारक्षकांवर ते विश्वास टाकतात. परंतु येथे तर सर्वकाही आलबेल आहे. बाहेरील युवक मुलींच्या वसतिगृहात शिरल्यामुळे येथील इतर मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे.

कारवाईची गरजमुलींच्या वसतिगृहात युवक शिरल्यामुळे येथील मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. उद्या कोणीही वसतिगृहात शिरून मुलींची छेडखानी करेल. भविष्यात असा प्रकार होऊ नये. या दृष्टीकोनातून कुलगुरूंनी वसतिगृहाच्या अधीक्षिका आणि सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी