शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दराेड्याचा प्लान रचणाऱ्या तत्कालीन मॅनेजरला ठाेकल्या बेड्या

By आशीष गावंडे | Updated: July 2, 2024 22:09 IST

पाेलिसांनी सुरत,नाशिकमधून केली तीन आराेपींना अटक

अकाेला: न्यू आळशी प्लॉट येथील उद्योजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी दराेडा घालणाऱ्या आराेपींच्या अवघ्या चार दिवसांत स्थानिक गुन्हे शाखा व खदान पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. केडिया यांच्याकडे सन २०११ मध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या पुष्पराज शाहा रा.सुरत याच्यासह तीन आराेपींना बेड्या ठाेकल्याची माहिती मंगळवारी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.

पुष्पराज शाहा (३६) रा.सुरत, पुष्पराजचा मामा सचिन शाहा, विनायक देवरे दाेन्ही राहणार नाशिक अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. तीन आराेपी अद्याप फरार असून त्यांचाशाेध घेतला जात आहे. खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या न्यू आळशी प्लॉटमध्ये उद्योजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी २७ जून राेजी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांनी एका मुलीचा शाेध घेत असल्याचे सांगत घरात प्रवेश केला हाेता.

केडिया यांच्या गळ्याला चाकू लावत ‘तुमच्या मुलाला मुंबइत मारुन टाकू,त्याठिकाणी आमची माणसे उभी आहेत’, अशी धमकी देत लुटमार केली हाेती. याप्रकरणी खदान पाेलिसांत भादंवि कलम ३९२, ३९७, ४५२,३४ अन्वये गुन्हा दाखल असून त्यामध्ये कट रचने व दराेडा घालणे या कलमान्वये १२० ब, ३९५ कलमची वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. पत्रकार परिषदेला शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी, ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके, खदानचे ठाणेदार गजानन धंदर उपस्थित हाेते. ..........................................१२ वर्षांपूर्वी ८० लाखांचा घाेळदराेड्याचा मुख्य सुत्रधार पुष्पराज शाहा असून ताे २०११ च्या सुमारास फिर्यादी केडिया यांच्याकडे मॅनेजर म्हणून काम करीत हाेता. त्यावेळी सहा हजार रुपये प्रति महिना मानधन असेल्या पुष्पराजने २०१२ मध्ये केडिया यांना ८० लाख रुपयांचा चूना लावला हाेता. त्यावरुन केडिया यांनी पुष्पराजला कामावरुन कमी केल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी दिली. ..............................................म्हणून आराेपींचा डाव फसलाकेडिया यांच्या घराची व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची दराेड्याचा सुत्रधार पुष्पराज याला इत्थंभूत माहिती हाेती. घरातील कपाटात लाखाे रुपये व दागदागिने राहत असल्याचेही त्याला माहिती हाेते. केडिया यांच्या घरी हात साफ केल्यास किमान २० लाख रुपये मिळतीलच,असा आराेपीला विश्वास हाेता. परंतु या घटनेच्या तीन महिन्यांपूर्वीच केडिया यांनी घरातील सर्व राेख व दागिने बॅंकेतील लाॅकरमध्ये ठेवल्याने आराेपींचा डाव फसला. ..........................................अन् हाती आले अवघे पंधराशे रुपयेआराेपींनी केडिया यांच्या घरातील कपाटाची झडती घेतली. त्यात त्यांना काहीही आढळून आले नाही. घरातील माेलकरणीच्या कानाचे हिसकावलेले दागिने नकली हाेते. तसेच केडिया यांच्या पाकीटात अवघे पंधराशे रुपये हाेते. हेच पैसे घेऊन आराेपींनी घाइघाइत पळ काढला. ..........................................‘राघवेंद्र’ला मारुन टाकू!आराेपींनी नवल केडिया यांच्या गळ्याला चाकू लावत ‘आरडाओरड केल्यास तुमचा मुलगा ‘राघवेंद्र’ला मारुन टाकू’ असा शब्दप्रयाेग केला आणि हाच धागा पकडून पाेलिस आराेपींपर्यंत पाेहाेचले. फिर्यादीचा मुलगा राघवेंद्र याला पाेलिसांनी विचारणा केली असता, मला या नावाने मुख्य आराेपी पुष्पराज हा हाक मारायचा,असे सांगितले. यावरुन पाेलिसांनी पुष्पराजचे लाेकेशन शाेधून त्याला बेड्या ठाेकल्या.

टॅग्स :RobberyचोरीAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी