मूर्तिजापूर तालुक्यातील 'रेस्ट हाऊस'ची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 04:02 PM2022-05-18T16:02:04+5:302022-05-18T16:02:35+5:30

The rest house in Murtijapur taluka deserted : एका रेस्ट हाऊस मध्ये चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले कार्यालयच थाटले आहे.

The rest house in Murtijapur taluka deserted | मूर्तिजापूर तालुक्यातील 'रेस्ट हाऊस'ची दुरवस्था

मूर्तिजापूर तालुक्यातील 'रेस्ट हाऊस'ची दुरवस्था

googlenewsNext

-संजय उमक
लोकमत न्यूज नेटवर्क

मूर्तिजापूर : शहरासह तालुक्यात ४ रेस्ट हाऊस ची निर्मिती ६० ते १०० वर्षापूर्वी करण्यात आली होती त्यापैकी एक निरिक्षण कुटी तयार करण्यात आली होती कालांतराने या कुटीचा रेस्ट हाऊस म्हणून उपयोग करण्यात येत असे, तर ५ रेस्ट हाऊस ची उभारणी करण्यात आली होती त्या पैकी  गाजीपुर निरीक्षण कुटी सह सर्व ५ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत  असल्याची माहिती आहे. या ५ पैकी ४ ओस पडले असून ३ रेस्ट हाऊसची दुरवस्था झाली आहे आणि एका रेस्ट हाऊस मध्ये चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले कार्यालयच थाटले आहे.
              शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशस्त असे दोन रेस्ट हाऊस आहेत, येथील क्रमांक १ च्या रेस्ट हाऊस  सन १९५९-६० च्या दशकात निर्मिती २ हजार १५५ स्क्वेअर मीटर क्षेत्रात व क्रमांक २ रेस्ट हाऊस  १९१८-१७ साली २ हजार १०२ स्क्वेअर मीटर क्षेत्रात उभारण्यात आले होते. गाजीपुर येथे काटेपूर्णा नदीवरील पुल बांधकामा दरम्यान १९६० मध्ये त्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी तेथे एक निरिक्षण कुटी तयार करण्यात आली होती, कालांतराने त्या कुटीचा 'रेस्ट हाऊस' म्हणून वापर करण्यात येत होता, आजच्या स्थितित ही वास्तू भग्नावस्थेत आहे, हिवरा कोरडे (बल्लारखेड) व धोत्रा शिंदे येथे एक रेस्ट हाऊस आहे परंतु हे रेस्ट हाऊस अनेक वर्षांपासून बंद असल्याने त्याची दैनंदिन अवस्था झाली असल्याने संपूर्ण मोडकळीस आले असून केवळ त्याचे अवशेष तिथे बाकी आहेत. शहरातील क्रमांक १ च्या रेस्ट हाऊस अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने त्याची डागडुजी करुन त्यात सार्वजनिक विभागाने आपले कार्यालय थाटले आहे तर क्रमांक २ च्या रेस्ट हाऊसची तिच स्थिती असून केवळ नावापुरतेच चालू असल्याचे चित्र आहे.

Web Title: The rest house in Murtijapur taluka deserted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.