शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बारदान्याअभावी जिल्ह्यातील नाफेडची खरेदी रखडली! शेतकरी अडचणीत

By रवी दामोदर | Updated: April 13, 2023 15:18 IST

खासगी बाजारात भाव कमी असल्याने प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी दि. १४ मार्चपासून सुरू झाली आहे.

अकोला : केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये नाफेडद्वारा हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून, बुधवार, दि.१२ एप्रिलपर्यंत ७ हजार २८९ शेतकऱ्यांकडून १ लाख २६ हजार ८७२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, नाफेडद्वारे नियोजन बिघडले असून, बारदान्याअभावी खरेदी रखडली आहे. खरेदी थांबल्याने हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

खासगी बाजारात भाव कमी असल्याने प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी दि. १४ मार्चपासून सुरू झाली आहे. शासनाने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना ४,३०० ते ४,६०० रूपये क्विंटलदरम्यान बाजार समित्यांमध्ये भाव मिळत आहे. हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत अद्याप हमीभाव इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या शासकीय खरेदीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकऱ्यांकडून नाफेडद्वारा शेतमाल खरेदी सुरू होती; मात्र आता बारदान्याअभावी खरेदी रखडली आहे. 

ऐन खरीप हंगामाची तयारी तोंडावर असताना नाफेडद्वारा खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाफेडद्वारा नियोजन बिघडल्यानेच खरेदी रखडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी बारदाना उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र आगामी दोन-तीन दिवस बारदाना पोहोचणार नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. जिल्ह्यात तब्बल १८ हजारांवर शेतकऱ्यांनी नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील नाफेड खरेदी बंद; शेतकऱ्यांमध्ये धास्तीबुलढाणा जिल्ह्यातील नाफेडद्वारा सुरू असलेली हरभरा खरेदी अचानक बंद झाली आहे. उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून नाफेडच्या हरभरा खरेदीचा काटा बंद करण्यात आला आहे. त्याच्या दोन दिवसांत अकोला जिल्ह्यातील खरेदीही बारदान्याअभावी रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. आगामी दोन-तीन दिवसात बारदाना पोहोचण्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे खरेदी बंद राहण्याचा अंदाज आहे.

बारदान्याअभावी जिल्ह्यातील काही केंद्रातील खरेदी रखडली आहे. आगामी दोन-तीन दिवसांत बारदाना पोहोचणार असून, त्यानंतर खरेदी सुरळीत होणार आहे.- पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला.

टॅग्स :Farmerशेतकरी