शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

'पोलिसांनी लोकाभिमूख कार्यातून जनतेचे सेवक बनावे, प्रत्येक नागरिकाला न्याया द्यावा'

By नितिन गव्हाळे | Updated: October 7, 2022 13:36 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे थाटात लोकार्पण

अकोला: अकोला पोलीस दलाला सुसज्ज आणि भव्यदिव्य पोलीस अधीक्षक कार्यालय मिळाले आहे. या कार्यालयातून पारदर्शी कारभार व्हावा. लोकाभिमुख पद्धतीने काम करीत,जनतेचे सेवक म्हणून पोलिसांनी  काम करावे. संविधानाने दिलेल्या कायद्याचे रक्षण करून कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा. तरच या नव्या इमारतीची भव्यता व दिव्यता वाढेल. अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. 

सिंधी कॅम्प परिसरातील अकोला पोलीस दलाच्या नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे ७ ऑक्टोबर रोजी ११.३० वाजता लोकार्पण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी महापौर अर्चना मसने, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक रितु खोकर, आर्कीटेक्ट सोहेल खान आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री असताना, मी अकोल्यातील नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीच्या प्रस्ताव मंजूर केला. आता या नवीन इमारतीमधून पारदर्शी कारभारासोबतच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण होऊन त्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. आताचे पोलीस दल हे इंग्रजकाळातील नाहीत. जनतेचे सेवक म्हणून त्यांनी काम करावे आणि कामाची पद्धत लोकाभिमुख करावी. असा सल्लाही त्यांना पोलिसांना दिला. 

दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले. आभार अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, ॲड. मोतीसिंह मोहता, हरिश आलिमचंदानी, जयंत मसने, सागर शेगोकार, आशिष पवित्रकार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसAkolaअकोला