ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष मार्चअखेरपर्यंत धावणार

By Atul.jaiswal | Published: March 2, 2024 05:35 PM2024-03-02T17:35:10+5:302024-03-02T17:35:55+5:30

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

the okha madurai weekly special will run till the end of march | ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष मार्चअखेरपर्यंत धावणार

ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष मार्चअखेरपर्यंत धावणार

अतुल जयस्वाल, अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही साप्ताहिक रेल्वे आता २९ मार्चपर्यंत धावणार आहे. या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

पश्चिम रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अधिसूचित असलेली ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ४ ते २५ मार्च २०२४ या कालावधीत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चौथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे. १ मार्च २०२४ पर्यंत अधिसूचित असलेली ०९५१९ मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ८ मार्च ते २९ मार्च २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १:१५ वाजता स्थानकावरून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी १०:२० वाजता ओखा स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी चार, अशा एकूण आठ फेऱ्या होणार आहेत.

Web Title: the okha madurai weekly special will run till the end of march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.