शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

हुंडीचिठ्ठी दलालांच्या दहशतीने कॉन्ट्रॅक्टर अज्ञातस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:41 IST

अकोला : अनधिकृतरीत्या चालत असलेल्या हुंडीचिठ्ठी या व्याजाच्या व्यवसायातील दलालांनी गुंडांना सोबत घेऊन अकोल्यातील काही व्यापारी व उद्योजकांना धमक्या दिल्याने अकोल्यातील मोठे कॉन्ट्रॅक्टर राम देवानी व त्यांच्यासह सात ते आठ मोठे उद्योजक व व्यापारी हुंडीचिठ्ठी दलालांच्या दहशतीने अकोल्यातून काढता पाय घेत अज्ञातस्थळी वास्तव्यास गेल्याची माहिती आहे

- सचिन राऊतअकोला : अनधिकृतरीत्या चालत असलेल्या हुंडीचिठ्ठी या व्याजाच्या व्यवसायातील दलालांनी गुंडांना सोबत घेऊन अकोल्यातील काही व्यापारी व उद्योजकांना धमक्या दिल्याने अकोल्यातील मोठे कॉन्ट्रॅक्टर राम देवानी व त्यांच्यासह सात ते आठ मोठे उद्योजक व व्यापारी हुंडीचिठ्ठी दलालांच्या दहशतीने अकोल्यातून काढता पाय घेत अज्ञातस्थळी वास्तव्यास गेल्याची माहिती आहे; मात्र त्यांचे कुटुंबीयही अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने उद्योजक वर्तुळात शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत.अकोल्यात बिल्डर व्यवसायात भरारी घेतलेल्या राम देवानी यांनी राष्ट्रीय महामार्गाचा काही अंतराचा कंत्राट घेतला होता. यासाठी त्यांनी कोट्ट्यवधी रुपयांची रक्कम या महामार्गाच्या बांधकामात गुंतविली. त्यानंतर कामाचे देयक निघणार असतानाच राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज बंद झाले. या काम बंदमुळे राम देवानीसह आणखी काही कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले. त्यांनी रस्त्याच्या बांधकामासाठी हुंडीचिठ्ठी दलालांकडून घेतलेली रक्कम परत करण्यास मोठे संकट आल्याने काही दिवसांचा कालावधी मागितला; मात्र पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने देवानी यांनी दलालांना पैसे परत करण्याची हमी देत काही महिन्यांचा कालावधी मागितला. अशातच त्यांच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निवासस्थानी जाऊन काही हुंडीचिठ्ठी दलालांनी गुंडांना सोबत घेऊन धमक्या दिल्या. त्यामुळे राम देवानी अनेक दिवसांपासून अज्ञातस्थळी असून, त्यांचे कुटुंबीयही अकोल्यात दिसत नसल्याची माहिती आहे. देवानीसह आणखी काही कंत्राटदार, उद्योजक व व्यापारी हुंडीचिठ्ठी दलालांच्या दहशतीने अकोल्यातून गायब झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. 

तीन टक्क्यांच्यावर व्याजदरहुडीचिठ्ठी दलालांनी तब्बल तीन टक्के ते त्यापेक्षाही व्याजदर आकारला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे भरमसाट व्याज आकारणाऱ्या दलालांचीही चौकशी करण्याची मागणी व्यापारी व उद्योजकांनी केली आहे. आर्थिक अडचणीत असल्याने व्यापारी व उद्योजक पैसे देण्यास वेळ करीत असल्याची माहिती आहे.दहशतीने घाबरल्याने पोलीस तक्रार नाही!हुंडीचिठ्ठीच्या व्यवसायात आता गुंडांचा शिरकाव झाल्याने व्यापारी व उद्योजक दहशतीत आहेत. वारंवार गायब करण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे राम देवानीसह काही व्यापाºयांनी पोलीस तक्रार केली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पोलीस तक्रारीसाठी ठाण्यापर्यंत पोहोचलेल्यांनाही ठाण्यातून परत बोलाविण्यात आले. हुंडीचिठ्ठीचे पैसे घेतलेल्यांनी पैसे परत करण्यासाठी वेळ मागितला आहे; मात्र तो मिळत नसल्याने आपसात वाद वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी