शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरू महिलेचा घरमालकाच्या जावयाकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 10:46 IST

महिलेने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय तायडे नामक आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डाबकी रोडवर भाड्याच्या घरात राहणाऱ्या २८ वर्षीय विधवा महिलेचा घरमालकाच्या जावयाने विनयभंग केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. महिलेने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय तायडे नामक आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.डाबकी रोडवरील रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सदर महिला तीन मुलांसह फडके नगरमध्ये भाड्याचे घर घेऊन राहते. ही महिला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गांधी रोड वरील एका दुकानात काम करीत आहे. या महिलेवर घरमालकाच्या जावयाची नजर पडली. हा प्रकार पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने ते घर सोडले आणि दुसरीकडे घर घेतले. तिथे २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता महिला मैत्रिणीसोबत बोलत असताना आरोपी संजय तायडे तेथे आला व मोबाइल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला आहे तो काढ व मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून महिलेसोबत अश्लील बोलून निघून गेला. ही घटना महिलेने आरोपीच्या पत्नीलाही सांगितली; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आरोपी संजय तायडे हा वारंवार महिलेचा पाठलाग करीत असून, त्रास देण्याच्या उद्देशाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी संजय तायडे याच्याविरुद्ध भारतीय दंडविधानच्या कलम ३५४ अ, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र तिला पोलीस अधिकाºयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलीसही दबावात असल्याचा आरोप तिने केला असून, या प्रकरणात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी लक्ष घालण्याची मागणी महिलेने केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग