शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अस्थायी कला शिक्षकांची मनपा आयुक्तांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:46 IST

अकोला : महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांवर प्रशासनाने बडतर्फीची कारवाई केली होती. यापैकी सात शिक्षकांनी गुरुवारी ...

अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांवर प्रशासनाने बडतर्फीची कारवाई केली होती. यापैकी सात शिक्षकांनी गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे धाव घेऊन त्यांना सेवेत सामावून घेण्याची विनंती केली. यावर सदर प्रकरणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेणार असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा मुद्दा शिक्षण विभागाने उपस्थित केला होता. शिक्षण विभागाचा अभिप्राय लक्षात घेऊन एकाच मुद्यावर काही अस्थायी कला शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अनेक याचिका दाखल करून ठेवल्या होत्या. यातील काही शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगाची रक्कम व महागाई भत्ता अदा झाल्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संजय गणोरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्यामुळे त्यांना अदा केलेली रक्कम वेतनातून वसूल करण्याचा आदेश जारी केला होता. यादरम्यान, नागपूर खंडपीठानेसुद्धा अस्थायी शिक्षकांबद्दल मनपा प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक निर्माण केलेला गोंधळ ध्यानात घेता महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी अस्थायी कला शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून निष्कर्षाअंती सर्व नऊ कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली. यानंतर काही शिक्षकांनी शासनाकडे धाव घेऊन मानवतावाद दृष्टिकोनातून मनपाने पुन्हा सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाºयांनी यासंदर्भात मनपाने निर्णय घेण्याचे सूचित केले होते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी बडतर्फ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात मनपात मानधन तत्त्वावर नियुक्ती केली होती. अजय लहाने यांच्या बदलीनंतर बडतर्फ कला शिक्षकांनी मनपाचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती.महापौर म्हणाले, शक्यच नाही!महापौर विजय अग्रवाल तसेच मनपाचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासोबत जानेवारी २०१८ मध्ये बडतर्फ कला शिक्षकांची बैठक पार पडली होती. कला शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणात नागपूर खंडपीठाने दिलेला आदेश व मनपा प्रशासनाने केलेली कारवाई पाहता सर्वसाधारण सभा कला शिक्षकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट मत महापौर विजय अग्रवाल यांनी नोंदविले होते.

अस्थायी कला शिक्षकांच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई केली होती. सदर प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घ्यायचे किंवा नाही, यावर निर्णय घेता येईल. बैठकीत त्यांची बाजू समजून घेतली आहे.-संजय कापडणीस,आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका