शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हाऱ्यातील व्यापारी वाटमारीचा नव्हे हनीट्रॅपचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 11:30 IST

HoneyTrap दोघींनी त्याला अडवत त्याच्या जवळील सोने आणि रोख मागितली.

ठळक मुद्देतरुणी व तिच्यासोबत आलेली एक महिला यांची वर्मा यांच्यासोबत गाठभेट झाली.सोने आणि रोख मागितली;अन्यथा बलात्कार केल्याची तक्रार देण्याची धमकी दिली.लोकांना गंडविण्याचा त्यांचा व्यवसायच असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तेल्हारा येथील व्यापाºयाने दहीहांडा पोलीस ठाण्यात दिलेली वाटमारीची तक्रार बनावट असल्याचे समोर आले आहे. दोन युवतींच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर सोन्याचे दागीने युवतींनी पळविले. ते कृत्य झाकण्यासाठी व्यापाºयाने वाटमारीची बनावट तक्रार केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले आहे.तेल्हारा येथील व्यापारी अजय वर्मा यांनी २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता गांधीग्रामवरून जात असताना चार अज्ञात इसमांनी मारहाण करून लुटल्याची तक्रार दहीहांडा पोलीस ठाण्यात दिली होती. व्यापाºयाने बदनामीच्या भीतीपोटी हनीट्रॅप लपवित गांधीग्रामजवळ लुटमार झाल्याची तक्रार दिली; मात्र स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत, हनीट्रॅपमधील दोन्ही युवतींना अटक केली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी वर्मा यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ (३४) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. अजय वर्मा यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत असतानाच ते चुकीची माहिती देऊन काही माहिती लपवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.त्यामुळे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणातील मूळ मुद्याला हात घालताच वर्मा यांनी सत्य सांगण्यास सुरुवात केली. त्यानुसार तरुणीला भेटण्यासाठी वर्मा अकोल्यात आले होते. अकोट रोडवरील पाचमोरी येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या शेतात तरुणी व तिच्यासोबत आलेली एक महिला यांची वर्मा यांच्यासोबत गाठभेट झाली. त्यांच्यातील मधुर भेट आटोपल्यानंतर व्यापारी वर्मा तेल्हाºयाला जाण्यासाठी निघाला असता दोघींनी त्याला अडवत त्याच्या जवळील सोने आणि रोख मागितली. अन्यथा बलात्कार केल्याची तक्रार देण्याची धमकी दिली. दोन्ही महिलांच्या धमकीला घाबरून वर्माने अंगावरील १३ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख महिलांच्या स्वाधीन केले आणि तो घराकडे निघाला; मात्र या प्रकरणाचा भंडाफोड होईल या भीतीने त्याने चार अज्ञातांनी लुटल्याची बनावट तक्रार दिली; मात्र स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत अजय वर्मा यांच्या कबुलीजबाबवरून तरुणी व एका महिलेस अटक केली. दोन्ही महिला हनीट्रॅपमध्ये सराईत असून, लोकांना गंडविण्याचा त्यांचा व्यवसायच असल्याची माहिती आहे. दरम्यान अकरा वर्षांपूर्वी अकोल्यात गाजलेल्या सेक्स कँडलशी या युवतींचा संबंध असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारे लुटमार झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बदनामीच्या भीतीने बनावाट तक्रारतेल्हारा येथील एका व्यापाºयाला हनीट्रॅपमध्ये ओढून त्यांच्यासोबत रात्र घालवल्यानंतर व्यापारी परत जाण्यासाठी निघाला असता या युवतीने बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत व्यापाºयाच्या अंगावरील सोने व चांदीचे दागिने पळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीTelharaतेल्हारा