शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा : आधी रस्ता दया, मगच शाळा बंद करा; मालपुरावासीयांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:15 IST

तेल्हारा : तालुक्यातील मालपुरा गावातील शाळा बंद करण्याबाबतचे पत्र शासनाने दिले आहे. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर गावाला प्रवेश देण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ज्या गावात आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल, तेथील अंतर आपल्या गावापासून कमी असले, तरी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे, असा प्रश्न तालुक्यातील मालपुरा येथील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देगावातील शाळा बंद होणारगावातील विद्यार्थ्यांना जवळच्या गावातील शाळांमधये देणार प्रवेशरस्ता नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील मालपुरा गावातील शाळा बंद करण्याबाबतचे पत्र शासनाने दिले आहे. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर गावाला प्रवेश देण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ज्या गावात आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल, तेथील अंतर आपल्या गावापासून कमी असले, तरी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे, असा प्रश्न तालुक्यातील मालपुरा येथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे  आधी रस्ता दया, मगच शाळा बंद करा, अशी मागणी मालपुरावासीयांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे १८ डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे. मालपुरा हे गाव १00 टक्के दलित वस्तीचे असून, तेथे इयता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू होती. सदर शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने दोन शिक्षक येथे कार्यरत होते. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने सदर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला व सदर गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतर असणार्‍या तळेगाव बजार या गावातील शाळेत सदर शाळेतील विद्याथ्यार्ंना प्रवेश घेण्याबाबत सूचना देण्यात आली. मालपुरा या गावातून तळेगाव बाजार येथे जाण्यासाठीचा रस्ता हा शेतरस्ता असल्याने पावसाळाच्या दिवसात या रस्त्याने ये-जा करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळय़ाच्या दिवसात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आधी रस्ता बांधा, मगच गावातील शाळा बंद करा, अशी भूमिका घेतली असून, तीव्र आंदोलनाचा इशाराही जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनावर राम विकास चर्‍हाटे, संतोष चर्‍हाटे, विशाल गवारगुरू, नरेंद्र चर्‍हाटे, कैलास चर्‍हाटे, विकास दांडगे, अनिल पंचाग, सुभाष चर्‍हाटे, नागेश तेलगोटे, सूर्यकांता तेलगोटे, मायावती तेलगोटे, तृप्ती वानखडे, अनुराधा चर्‍हाटे, गौरव पचांग, नितीन पंचांग यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत. 

टॅग्स :Telharaतेल्हाराSchoolशाळाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय