शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा पंचायत समितीचा कृती आराखडा कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:11 IST

तेल्हारा : तालुक्यात चार गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बर्‍याच गावात कूपनलिकेचे दूषित पाणी गावकर्‍यांना प्यावे लागते. पंचायत समितीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असला, तरी सदर कृती आराखडा केवळ कागदावरच आहे.

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यातील चित्र चार गावांत पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वीज पुरवठा खंडित झाल्याने, नियोजन नसल्याने तर काही गावामध्ये पाण्याचे स्रोत आटल्याने तेल्हारा तालुक्यात चार गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बर्‍याच गावात कूपनलिकेचे दूषित पाणी गावकर्‍यांना प्यावे लागते. पंचायत समितीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असला, तरी सदर कृती आराखडा केवळ कागदावरच आहे.तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २९ गावांमध्ये पंचायत समितीने नवीन कूपनलिका घेण्याचे प्रस्तावित आहे. खापरखेडा, खेल सटवाजी, उमरी, भिली, तुदगाव, वाकोडी, सौंदळा, सोनवाडी, चिपी, इसापूर, अटकळी, कोठा, तळेगाव पातुर्डा, मनात्री, सदरपूर, वरूड वडनेर, मालपुरा, धोंडा आखर, माळेगाव बाजार, तळेगाव बु., तळेगाव वडनेर, पिवंदळ बु., चिचारी, दिवानझरी, बेलखेड, राखेड, भोकर, वाडी अदमपूर या २९ गावांमध्ये काही गावात नवीन कूपनलिका घेणे तर पंचायत समितीच्या २0१७ च्या कृ ती आराखड्यात २४ गावांतील २८0१0 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरात मिळाली होती. यामध्ये नळ पुरवठा, विशेष दुरुस्ती तीन कामे, तात्पुरती योजना चार गावे अशी प्रस्तावित कामे होती. प्रत्यक्षात कुठेही काम करण्यात आलेले नव्हते. तालुक्यात पाण्याची पातळी वाढावी म्हणून जलयुक्त शिवार योजना राबवून ५ ते ६ कोटी खर्च करून १२ नदी खोलीकरण बंधारे, शेततलाव ही कामे तालुक्यात मोठय़ा प्रमाणात करण्यात आली; पण पाहिजे तशी पाण्याची पातळी वाढली नसल्याचे दिसते.

तालुक्यात होणार सहा कोटींची कामे!सन २0१७-१८ मध्ये कृ षी विभागाने पाण्याची पातळी वाढावी म्हणून नाला खोलीकरण, नवीन सिमेंट बांध खोलीकरण व रुंदीकरण, ई-क्लास शेततळे, गाव तलाव, विहीर पुनर्भरण, गाव तलाव दुरुस्ती व इतर कामे करण्यासाठी या कामावर जवळपास सहा कोटी रुपयांचे काम तालुक्यात होणार आहे. तालुक्यात जास्तीत जास्त कामे व्हावी म्हणून तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर व कृ षी तालुका कृ षी अधिकारी अविनाश मेश्राम प्रयत्न करीत आहेत.

या गावांमध्ये कूपनलिका प्रस्तावितखापरखेडा, खेल सटवाजी, उमरी, भिली, तुदगाव, वाकोडी, सौंदळा, सोनवाडी, चिपी, इसापूर, अटकळी, कोठा, तळेगाव पातुर्डा, मनात्री, सदरपूर, वरूड वडनेर, मालपुरा, धोंडा आखर, माळेगाव बाजार, तळेगाव बु., तळेगाव वडनेर, पिवंदळ बु., चिचारी, दिवानझरी, बेलखेड, राखेड, भोकर, वाडी अदमपूर.

तालुक्यात बर्‍याच गावांमध्ये पाणीटंचाई आहे. त्या गावांमधील प्रस्ताव बोलावून सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजुरी मिळाल्यानंतर कामांना सुरुवात करण्यात येईल.- सचिन झापर्डे, उपसभापती, पं.स. तेल्हारा.

मालठाणा बु. हे गाव शिवाजीनगरमध्ये येत असून, येथे एक कूपनलिका आहे. या एका कूपनलिकेवर मशीन आहे. येथे वारंवार विद्युत पुरवठा बंद झाल्यास गावकर्‍यांचे पाणी होत नाही, त्यामुळे गावकरी शेतातून पाणी आणतात. गावकर्‍यांनी वेळोवेळी मागणी करूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.- डॉ. पंजाबराव धामोडे, सदस्य, ग्रा. पं. शिवाजीनगर.

टॅग्स :Telharaतेल्हाराWaterपाणीgram panchayatग्राम पंचायत