शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुका कृषी विभागाकडे बोंडअळीग्रस्त १५00 शेतकर्‍यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 20:40 IST

तेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

ठळक मुद्देतक्रारींचा ओघा सुरुचा; अर्ज देण्यासाठी लागल्या शेतकर्‍यांच्या रांगाकृषी विभागाचे अधिकारी करताहेत तक्रारकर्त्यांच्या शेतात जाऊन पंचनामे 

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.तेल्हारा तालुका हा विदर्भात कापूस पट्टा म्हणून ओळखल्या जातो. तालुक्यात जलसिंचन असल्याने यावर्षी २२ हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली. त्यात शेतकर्‍यांनी या पिकावर एकरी २0 ते २२ हजार रुपये खर्च केला व मे महिन्यात भरउन्हात पाणी देऊन कपाशी जगवली; मात्र काही महिन्यांपासून कपाशीवर गुलाबी बोंडअळी आल्याने एकरी १२ ते १५ क्विंटल होणारे उत्पादन केवळ २ ते ४ क्विंटल प्रतिएकर झाले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घटून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी बिटी बियाणे बोगस असल्याची तालुक्यातील १५00 शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारींचा ओघ मोठय़ा प्रमाणात चालू आहे. तक्रारी करणार्‍या शेतकर्‍यांच्या मोठय़ा रांगाच लागल्या आहेत. तक्रारी मिळाल्यानंतर कृषी विभाग शेतात जाऊन पंचनामे करीत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत ७00 शेतकर्‍यांचे पंचनामे केले आहेत. शासनाने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना सर्व्हे करून त्वरित मदत करावी, अशी मागणी होत आहे. उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने शेतकर्‍यांचे मनोबल पूर्ण खचले. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :Telharaतेल्हाराFarmerशेतकरी