शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

टेली आयसीयू : औरंगाबाद, सोलापूर, जालन्यामध्ये सुरू; अकोला अजूनही वेटिंगवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 11:13 IST

अकोला वगळता इतर चारही जिल्ह्यांमध्य टेली आयसी यू कार्यान्वित झाले; मात्र अकोला अजूनही वेटिंगवरच आहे.

अकोला : कोरोनामुळे वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी टेली आयसीयू हे प्रभावी ठरेल, असा दावा आरोग्य मंत्र्यांनी केला होता. राज्यातील अकोला, जालना, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद येथे टेली आयसीयू ची यंत्रणा उभारण्याची घोषणाही जुलै महिन्याच्या अखेरीस केली होती. यापैकी अकोला वगळता इतर चारही जिल्ह्यांमध्य टेली आयसी यू कार्यान्वित झाले; मात्र अकोला अजूनही वेटिंगवरच आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूदरही वाढताच आहे. सप्टेंबर महिना हा कोरोना संक्रमणाचा उच्चांक गाठणारा महिना ठरणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसातच सर्वाधिक रुग्ण व दिवसाला सरासरी दोन मृत्यू होत असल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. कोरोनामुळे जीव गमावावा लागलेल्या बहुतांश रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त इतरही आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या रुग्णांना इतर आजारावरील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासते; परंतु ऐन वेळी जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात टेली आयसीयू सुरू करण्यास मान्यता मिळाली होती.जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होऊनही सर्वोपचार रुग्णालयात टेली आयसीयू सुरू झाले नाही. रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर रुग्ण असलेल्या कोविड वॉर्डात सीसी कॅमेरे लावण्यात आले. ब्रॉडबँड जोडणी नसल्याने टेली आयसीयू सुरू करण्यास अडचणी येत असल्याची माहिती, सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने दिली.

ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिकाटेली आयसीयू सुरू झाल्यास मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुकास्तरावरील कोविड सेंटरवरील गंभीर रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. अकोल्यासह इतर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर येथील रुग्णांवर उपचारासंदर्भात डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतील, अशी व्यवस्था आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय