शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा विरोध; समायोजन पुढे ढकलले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 15:58 IST

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३ जुलै रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले.

अकोला : जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया शनिवारी जिल्हा परिषदेत निश्चित करण्यात आली होती; मात्र नियमानुसार समायोजनाची प्रक्रिया करण्याची मागणी करीत, नियोजित समायोजन प्रक्रियेला शिक्षकांनी विरोध केल्याने, अखेर जिल्हा परिषद शिक्षकांचे समायोजन पुढे ढकलण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३ जुलै रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया शनिवार, २९ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात ठरविण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्हा परिषद परिसरात शिक्षकांची गर्दी जमली होती; परंतु १८ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा हा कालावधी नसून, समायोजन करण्याचा कालावधी संपल्यामुळे २८ जून २०१९ रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार आणि ३० सप्टेंबर २०१९ रोजीच्या पटसंख्येनुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे शनिवारी ठरलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पुढे ढकलण्यात आले असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आता ३ जुलै रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले.शिक्षकांनी दिला ठिय्या!शनिवारी ठरलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला विरोध करीत आणि नियमानुसार समायोजन करण्याची मागणी करीत शिक्षक संघटनांच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. १८ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषद अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेपूर्वी पदोन्नतीची कार्यवाही करणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही. तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा कालावधी संपल्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ च्या पटसंख्येनुसार समायोजन करण्यात यावे, अशी मागणी करीत नियमबाह्य समायोजन स्थगित करण्याची मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यानुषंगाने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर शिक्षकांचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.  यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गायकवाड, महाराष्ट्र शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय घोडे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रजनीश ठाकरे, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष केशव मालोकार, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. एन. मेश्राम यांच्यासह पुरोगामी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष महल्ले, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय भाकरे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

यादीवर १ जुलैपर्यंत मागितले आक्षेप!जिल्हा परिषद अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३ जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी समायोजनास पात्र अतिरक्त शिक्षकांच्या यादीवर सोमवार, १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून, मंगळवारी आक्षेपांची छाननी व सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर ३ जुलै रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदTeacherशिक्षक