शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हजारो बेरोजगार शिक्षकांचे स्वप्न पूर्ण होणार; शिक्षक भरती फेब्रुवारीमध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 13:35 IST

अकोला: शिक्षक भरतीवरील बंदी उठवित शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला.

अकोला: शिक्षक भरतीवरील बंदी उठवित शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी डीएड, बीएड, एमएड बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. या नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी भरतीची प्रक्रिया निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच म्हणजेच फेब्रुवारीमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्य शासनाने २0१0 पासून शिक्षक भरतीवर बंदी घातल्यामुळे शेकडो शाळांमधील हजारो शिक्षकांची पदे रिक्त होते. शिक्षक संघटना, संस्था चालकांकडून सातत्याने शिक्षक भरती सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेतली. राज्यातील १ लाख ७१ हजार ३४८ बेरोजगार शिक्षक उमेदवारांनी ही चाचणी दिली. एवढेच नाही, तर या शिक्षकांनी भरतीसाठी पवित्र पोर्टलवर माहितीसुद्धा भरली. नववर्षामध्ये बेरोजगार शिक्षक उमेदवारांना आनंदाची बातमी मिळणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती खुद्द राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली. शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून बिंदू नामावली अद्ययावत करणे, एसईबीसी प्रवर्ग लक्षात घेऊन बिंदू नामावली विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे पाठवून अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पवित्र पोर्टलवर व्यक्तिगत माहिती बदल करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. संचमान्यतेतील गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही शिक्षण आयुक्तांनी दिली.निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे, रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येईल.-विशाल सोळंकी,आयुक्त शिक्षण आयुक्त.रिक्त पदे- २0 हजारपवित्र पोर्टलवर नोंदणी-१ लाख २१ हजार ६१५पात्र उमेदवार- १ लाख ८ हजार ४६४

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र