शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेने केला तांबे, पितळ, काश्याच्या पुरातन भांड्यांचा संग्रह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:54 IST

अशाच एक शिक्षिका आहेत, शैला नंदकुमार चेडे. त्यांना दुर्मीळ व पुरातन भांड्यांचा संग्रह करण्याचा अनोखा छंद आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: जीवनामध्ये प्रत्येकाला काहीतरी वेगळे करण्याची आवड असते. वेगळा छंद असतो. ही आवड, हा छंद जोपासण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. कोणी पोस्टाची तिकिटे, माचीस, देश-विदेशातील नोटा, नाणींचा संग्रह करतात तर कुणी पुरातन भांडी, छायाचित्रांचा संग्रह करतात. अशाच एक शिक्षिका आहेत, शैला नंदकुमार चेडे. त्यांना दुर्मीळ व पुरातन भांड्यांचा संग्रह करण्याचा अनोखा छंद आहे. आजमितीस त्यांच्याकडे शेकडो दुर्मीळ व पुरातन अशी तांबे, पितळ, काश्याची भांडी आहेत. गत ३५ वर्षांपासून शैला चेडे यांनी हा छंद जोपासला आहे.शैला चेडे या महान येथील राज गिद पाटील विद्यालयात क्रीडा शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या माहेरी तांबे, पितळ, काश्याची भरपूर भांडी होती. सासरी आल्यानंतरही त्यांना, आजेसासू, सासूबार्इंकडून अनेक दुर्मीळ व पुरातन पितळ, तांबे, काश्याची भांडी मिळाली. पुढे घरगुती वापरातून ही भांडी हद्दपार होऊ लागली. तांबे, पितळ, काश्याच्या भांड्यांची जागा स्टिलच्या भाड्यांनी घेतली. घरातून हळूहळू तांबे, पितळ, काश्याची भांडी गायबच झाली. ही दुर्मीळ भांडी घरात कायम राहावी आणि त्याचा संग्रह करावा, असे शैलातार्इंच्या मनात आले आणि घरातीलच काही जुनी तांबे, पितळ, काश्याची भांडी बाहेर काढली. चकचकीत केली. एवढेच नाही, तर बाहेर कुठे गेल्या आणि त्यांना दुर्मीळ व पुरातन तांबे, पितळ, काश्याची भांडी दिसली की, त्या विकत घेऊ लागल्या. पाहता-पाहता त्यांनी शेकडो तांबे, पितळ, काश्याची भांडी गोळा केली. सध्या ही भांडी कुठेच दिसत तर नाही, शिवाय मिळतही नाहीत. त्यांच्याकडे अनेक दुर्मीळ पानपुडे, काश्याचा कोपर, वॉल हॅगिंग, ताटे, ग्लास, दिवे, फुलांच्या परड्या, पितळचे लाटणे, सराटे, घंगाळ, तांबे-पितळचे जार, सायकलीच्या लाइट-बॅटरींचा दुर्मीळ संग्रह आहे. त्यांच्याकडील हा संग्रह पाहून पुरातन काळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.मोगलकालीन नाण्यांचासुद्धा संग्रह!शैला चेडे यांनी तांबे, पितळ, काश्याची भांडी गोळा करण्यासोबतच पुरातन नाणी गोळा करण्याचा छंदसुद्धा जोपासला आहे. त्यांच्याकडे मोगलकालीन, ब्रिटिशकालीन अनेक नाणी आहेत. भांडी व नाणी गोळा करण्याच्या कामी त्यांचे पती डॉ. नंदकुमार चेडे, दोन मुलीसुद्धा मदत करतात.‘बॅटरी’शिवाय मिळायचा नाही सायकलचा परवाना!शैलातार्इंकडे स्वातंत्र्यपूर्व काळातील सायकलींचे लाइट-बॅटरीसुद्धा आहेत. पूर्वीच्या काळात सायकल घ्यायची असेल तर त्याला लाइट-बॅटरी असावीच लागायची. त्याशिवाय सायकलचा परवाना मिळत नसायचा, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक