शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी लागू करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 18:22 IST

शनिवारी दुपारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांना घेराव घातला आणि त्यांना निवेदन दिले.

अकोला: राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना २६ आॅगस्ट २0१९ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी दुपारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांना घेराव घातला आणि त्यांना निवेदन दिले.निवेदनामध्ये शासन निर्णयानुसार शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यासाठी प्रशिक्षणाची अट वगळण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. अशी मागणी विमाशि संघाने केली आहे. शिक्षणाधिकाºयांना घेराव घालून शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी लागू करण्याची मागणी रेटून धरण्यात आली. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर, जिल्हा कार्यवाह प्रदीप थोरात, अकोला तालुकाध्यक्ष जी.पी. ढगे, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, रामेश्वर तायडे, बी.जे. नंदाने, राजेश शेंडे, दिलीप देशमुख, जिल्हा सहकार्यवाह व्ही.जी. माळी, प्रविण लाजुरकर, माणिक गायकी, शशांक मोहोड, विजय अंधारे, दादा वंजारे, श्रीकांत दांदळे, विजय अंधारे, एस.डी. राठोड, शिवाजी ढगे, मो. चि. रेवस्कर, दे. व्य. घोरळ, गो. सांगुनवेढे, आशिष दांदळे, रितेश सांगळे, एस.एम. माथने, पी.व्ही. उजाडे, गजानन थोरात आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक