शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

राज्यात बालकांवरही टीबीचे संकट; वर्षभरात ६०० पेक्षा जास्त बालकांना टीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:19 IST

गत वर्षभरात राज्यात ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्दे ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे म्हटले आहे. क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.अनेक रुग्णांपर्यंत या योजना पोहोचत नसल्याने क्षय रोगाचे हे संकट वाढत आहे.

अकोला: पोलिओनंतर टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न सुरू असतानाच, राज्यात बालकांवर क्षयरोगाचे संकट ओढवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गत वर्षभरात राज्यात ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री यांनी विधान परिषदेत अहवाल सादर केला होता. बालकांमध्ये क्षयरोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असून, या संदर्भात जनजागृतीची गरज आहे.देशभरात टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत असून, यामध्ये बालकांचा समावेश लक्षणीय आहे. या संदर्भात विधान परिषदेत आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या एका अहवालानुसार, राज्यात मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे म्हटले आहे. देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत; मात्र अनेक रुग्णांपर्यंत या योजना पोहोचत नसल्याने क्षय रोगाचे हे संकट वाढत आहे.बालकांमध्ये टीबीची प्रमुख कारणे

  • गर्भवतींना क्षयरोग असल्यास मुलांना जन्मत:च क्षयरोग होण्याची शक्यता.
  • कुटुंबात किंवा शेजारी टीबीचा रुग्ण असल्यास संसर्गामुळे.
  • रोग प्रतिकारकशक्ती कमी असल्यास ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना टीबीचा धोका.

ही आहेत लक्षणे

  • दोन आठवड्यांपेक्षा जास्त ताप
  • वजन कमी होणे
  • भूक कमी लागणे
  • चालताना किंवा बसल्यावर दम लागणे
  • बेशुद्ध पडणे

अशी घ्या काळजी

  • पालकांनी जन्मत: बाळाला बीसीजी लस द्यावी
  • लवकरच निदान करून औषधोपचार सुरू करावेत
  • जास्त काळ ताप असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • उपचार अर्धवट सोडू नये

क्षयरोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असली, तरी शासनातर्फे त्याच्या समूळ नायनाटासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कुटुंबात किंवा जवळपासच्या परिसरात क्षयरोगाची लक्षणे रुग्णामध्ये आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. कुपोषित बालकांमध्येही क्षयरुग्णांची संख्या लक्षणीय असून, या बालकांवर विशेष लक्ष दिल्या जात आहे.- डॉ. मेघा गोळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य