शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

खरिपात १३९८ कोटी पीक कर्ज वाटपाचे ‘टार्गेट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 1:43 PM

अकोला: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट (टार्गेट) ठरविण्यात आले आहे.

- संतोष येलकर

अकोला: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट (टार्गेट) ठरविण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला असून, ८ मे रोजी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत या आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे.सन २०१९-२० या वर्षातील खरीप व रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा आराखडा जिल्हा अग्रणी बँकेमार्फत तयार करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामात जिल्ह्यात १ हजार ४७२ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या आराखड्यास ८ मे रोजी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली होणाºया जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.बँकनिहाय खरीप पीक कर्ज वाटपाचे असे उद्दिष्ट!बँक                                                         शेतकरी                 रक्कम (कोटीमध्ये)राष्ट्रीयीकृत बँका                                     ६५०९९                   ५२०.७०जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक                 ८४९०६                   ६७९.२५ग्रामीण बँक                                             १७४५६                     १३९.६५खासगी बँका                                             ७३८६                    ५९.०९.................................................................................................एकूण                                                      १७४८४७                 १३९८.७८कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६३.९५ कोटींची वाढ!गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यावर्षीच्या खरीप हंगामात १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६३ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ करण्यात आल्याचे चित्र आहे.गतवर्षीच्या हंगामातील असे आहे पीक कर्जाचे वाटप!गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४१९ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जbankबँकFarmerशेतकरी