शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतसारा भरण्याच्या नावाखाली शेतकऱ्याकडून सातशे रुपयांची लाच घेणारा तलाठी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 17:07 IST

सातशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याला लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात आली.

अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विझोरा येथील तलाठ्याने एका शेतकऱ्याला सातबारा देण्यासाठी शेतसारा भरण्याच्या नावाखाली सातशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याला सातशे रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.विझोरा येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्याला पीक कर्जाच्या कामासाठी सातबारा व आठ अ ची गरज होती. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने तलाठी हिम्मत रामभाऊ मानकर यांना सातबारा व आठ ’अ’ ची मागणी केली. मात्र सदर तलाठ्याने सातबारा व आठ ‘अ’ देण्यासाठी शेतसारा भरण्याच्या नावाखाली सातशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार शेतकऱ्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार १४ मे रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तलाठी हिंमत मानकर याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी सातशे रुपयांची लाच घेण्याचे ठरल्यानंतर शेतकऱ्याने लाचेची रक्कम तलाठी मानकर यांच्या हातात देताच सापळा लावलेल्या अकोला एसीबीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तलाठ्यास सातशे रुपयांच्या लाचेसह रंगेहाथ अटक केली. त्यानंतर सदर तलाठी विरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत घीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एस. मेमाने, सचिन धात्रक, गजानन दामोदर, श्रीकृष्ण पळसपगार यांनी केली.

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAkolaअकोला