शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

तडीपार आराेपीची तलवार घेऊन दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

अकाेला : सिटी काेतवाली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बागातील देवी मंदिराच्या परिसरात जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला आराेपी हातात ...

अकाेला : सिटी काेतवाली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बागातील देवी मंदिराच्या परिसरात जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला आराेपी हातात तलवार घेऊन दहशत पसरवित असताना पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पाळत ठेवून त्याला मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

जुने शहरातील गाडगे नगर परिसरातील रहिवासी आकाश रामा निनाेरे याला जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या प्रस्तावावरून त्याला तडीपार केल्यानंतर ताे अकाेल्यातच असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. आकाश निनाेरे हा हातात तलवार घेऊन बागातील देवी माता मंदिराजवळ दहशत पसरवित असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून निनाेरे यास अटक केली. त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. आराेपीविरुध्द सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात आम्स ॲक्टच्या कलम ४,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षीक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.