शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’ रुग्णांसाठी नाही ‘आयसोलेशन वॉर्ड’

By admin | Updated: February 14, 2015 01:29 IST

मेडिकलच्या विद्यार्थ्यासह महिलेवर उपचार.

सचिन राऊत / अकोला:ह्यस्वाइन फ्लूह्ण आजारावर प्रतिबंधासाठी आवश्यक असलेला ह्यआयसोलेशन वॉर्डह्णच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्वित नसल्याचे वास्तव समोर आले आहे. १९ क्रमांकाच्या वॉर्डातील एका खोलीत हा वॉर्ड ९ फेब्रुवारी रोजी कार्यान्वित केला, मात्र आवश्यक त्या सुविधा या वॉर्डात नसून, कुणाचाही सहज वावर असल्याने अनेकांना स्वाइन फ्लूचा धोका आहे. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळलेला वैद्यकीय महाविद्यालयातील सुरेश सिंह आणि वाशिम जिल्हय़ातील गरोदर महिला अरुणा रामप्रकाश अवचार यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांसोबतच वाशिम जिल्हय़ातील आणखी एका महिलेला स्वाइन फ्लू संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. वॉर्ड कार्यान्वित करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून आलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले नसून, थातूरमातूर वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लूचा धोका असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. गर्भवती असलेल्या महिलेलाही स्वतंत्र कक्षात न ठेवल्याने इतर महिलांना स्वाइन फ्लूची बाधा होण्याची शक्यता आहे. *एकापासून पाच विद्यार्थ्यांंना बाधाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षाला असलेल्या सिंह ला स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र त्यानंतरही त्याला रुग्णालयात दाखल न करता वसतिगृहातच ठेवल्याने आणखी पाच विद्यार्थ्यांंना बाधा झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. सिंहला स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळला असतानाही त्याला रुग्णालयात दाखल केले नसल्याने या आजाराचा सामना आणखी ५ विद्यार्थ्यांंना करावा लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे विद्यार्थ्यांसह आणखी काही रुग्णांना स्वाइन फ्लूचा धोका निर्माण झाला आहे.