शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

‘स्वाभिमानी’चा आघाडीला ४९ जागांचा प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 10:50 IST

पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये अनुकूल मतदारसंघाची निवड करून राज्यातील ४९ जागांची यादी आघाडीकडे सोपविली आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: काँग्रेस महाआघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढविलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभेसाठी ४९ जागांची यादी काँग्रेसकडे सोपविली असून, काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसवर दबाव वाढविण्यासाठी येत्या १९ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या पुढाकारात लहान पक्षांची बैठकही आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांनी नव्या जोमाने पक्षातील एकजूट कायम ठेवत विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. पश्चिम महाराष्टÑाबाहेरही स्वाभिमानीचा प्रभाव वाढावा या हेतूने गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये अनुकूल मतदारसंघाची निवड करून राज्यातील ४९ जागांची यादी आघाडीकडे सोपविली आहे. या यादीसंदर्भात अद्यापपावेतो आघाडीसोबत जागा वाटपाची कोणतीही बैठक झाली नसल्याने प्रत्यक्ष बैठकीत शेट्टी यांना किती जागा मिळतात, हे स्पष्टच होईल; मात्र सन्मानजनक जागा न दिल्यास वेगळा पर्याय निवडण्याचीही तयारी स्वाभिमानीने सुरू केली असल्याचीही माहिती आहे.यादीमध्ये दिला प्राधान्यक्रमस्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस आघाडीला दिलेल्या ४९ मतदारसंघाच्या यादीमध्ये अ,ब,क असा प्राधान्यक्रम दिला आहे. आघाडीमध्ये जागा वाटप करताना ‘अ’ वर्गवारीमधील जागांबाबत तडजोड न करण्याबाबत स्वाभिमानी आग्रही राहणार असल्याचीही माहिती आहे. लहान पक्षांचा दबावगट तयार करणारकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रबळ आघाडी तयार व्हावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न असला तरी या आघाडीत सन्मानजनक जागा मिळविण्यासाठी लहान पक्षांचा दबावगट तयार करण्याच्याही हालचाली सुरू आहेत. १९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील शेकापच्या कार्यालयात शेट्टी यांच्या पुढाकारात या पक्षांची बैठक नियोजित केली आहे. राज्यातील ४९ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांची यादी काँग्रेसकडे सोपविली आहे. अद्यापपावेतो चर्चेची बैठक झालेली नाही. आघाडीबाबत आम्ही आशावादी आहोत, जागा वाटपाच्या बैठकीत काय ठरते, त्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकरRaju Shettyराजू शेट्टी