शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बडतर्फ शिक्षकानेही दिली जातवैधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:43 IST

जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला टपालाद्वारे सादर केले.

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकाच्या बडतर्फीच्या आदेशाची अंमलबजावणी न करता गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत ठेवले. त्यासाठी वेतन, भत्त्यासह सातव्या वेतन आयोगाचा लाभही दिला. शिक्षण विभागाकडून कारवाईत दुर्लक्ष झाल्यामुळे तेल्हारा पंचायत समितीमधील बडतर्फ शिक्षक रमेश मावसकर यांनी २४ फेब्रुवारी रोजी प्राप्त केलेले जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला टपालाद्वारे सादर केले. ते सोमवारी प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे त्या शिक्षकाचा जातवैधता प्रस्तावही पंचायत समितीकडून परस्पर पाठवण्याचा प्रकार घडला आहे.जातवैधता प्रस्ताव सादर न करणाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १६ आॅक्टोबर २०१७ रोजी दिला होता. तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत चिपी गायरान शाळेतील रमेश नारायण मावसकर यांच्या बडतर्फीचा आदेश गटविकास अधिकाºयांना पाठविल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आहे. प्रत्यक्षात तो आदेश पंचायत समितीमध्ये पोहोचला नाही. ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड यांनी पाच दिवसांत चौकशी करण्याचा आदेश २९ जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांना दिला. तो अहवाल अद्यापही आला नाही. त्याचवेळी बडतर्फ शिक्षकाला कार्यरत ठेवण्यात आले. त्यामुळे शिक्षक मावसकर यांच्यावर बडतर्फीच्या कारवाईसाठी पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचेही प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड यांनी १३ फेब्रुवारी रोजी बजावले होते. तो प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्याचवेळी शिक्षक मावसकर यांनी अमरावती विभागीय जातपडताळणी समितीकडून २४ फेब्रुवारी रोजी प्राप्त केलेले जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला टपालाद्वारे पाठवले आहे. त्यामुळे आता बडतर्फीच्या आदेशानुसार कारवाई होणार की शिक्षकासह जबाबदार सर्वांना वाचवणार, ही बाब लवकरच स्पष्ट होणार आहे.

कारवाई न करण्यासाठी सेटिंगबडतर्फीच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्पष्ट झाले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढील कारवाई करणे आवश्यक होते; मात्र तेल्हारा पंचायत समितीसह जिल्हा परिषदेतील काही कलाकार कर्मचाºयांनी कारवाई न होण्यासाठी सेटिंग केल्याची माहिती आहे. मावसकर यांचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त होईपर्यंत कारवाई होऊ द्यायची नाही, असा प्रयत्न त्यासाठी करण्यात आला. त्यानुसारच ते जिल्हा परिषदेला टपालाद्वारे पाठवण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक